Subscribe Us

header ads

दिंद्रुडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या; 6 लाखांचा मुद्देमाल लंपास


माजलगाव-:तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी मध्यरात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. अहिल्यानगर आणि इतर दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम, दागिन्यांसह 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चार ते पाच चोरटे असल्याची प्राथमिक माहिती आहे.अहिल्यानगर येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी रवी सोन्नवर यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी खोल्यांच्या बाहेरून कड्या लावत स्वयंपाक घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरातील पेटी असलेले अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख पंधरा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.तरअन्य एका ठिकाणी अनिस असेफ शेख यांच्या घरात चोरट्यांनी घुसत कपाट फोडून दीड तोळा सोने व चांदी लंपास केली. बालु काचगुंडे यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला. मात्र, काचगुंडे यांना जाग आल्याने चोराटे रिकाम्या हाताने परत गेले. या चोरट्यांनी तोडलेली सर्व कुलूप सोबत नेली. चोरी करत असताना शेजारी घरांच्या कड्या बाहेरून लावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा