Subscribe Us

header ads

मुलाने गोळ्या घालून अख्खं कुटुंब संपवलं अन् मित्रांसोबत जाऊन केली पार्टी वडील, आई, बहिण आणि आजीची केली हत्या

रोहतक-:मुलानेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या रोहतकमधील घडलेल्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी २० वर्षीय मुलाला अटक केली आहे. मुलाने आपले वडील, आई, बहिण आणि आजीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्टला मुलाने गोळ्या घालून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर पोलिसांसमोर धाय मोकळून रडणारा मुलगाच आरोपी असल्याचं समजल्यानंतर शेजाऱ्यांसह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे.रोहतक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी त्यांना व्यावसायिक शत्रुत्वातून हत्या झाल्याचा संशय होता. मात्र मुलगा वारंवार आपला जबाब बदलत असल्याने त्यांना संशय आला. आरोपी मुलाचे वडील प्रॉपर्टी डीलर होते. यानंतर पोलिसांनी आरोपी अभिषेकला मंगळवारी संध्याकाळी ताब्यात घेतलं आणि चौकशी केली.चौकशीदरम्यान अभिषेनकने हत्येची कबुली दिली. मात्र हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्ही पुढील तपासासाठी त्याला रिमांडमध्ये घेतलं आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.तपासादरम्यान आई, वडील, बहिण आणि आजीची हत्या केल्यानंतर मुलगा मित्रांसोबत हाय-एण्ड हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता अशी माहिती मिळाली आहे,” असं अधिकाऱ्याने सांगितलं.मुलाने आम्हाला सांगितलं की, मित्रांसोबत पार्टी करत असताना कुटुंबीयांची हत्या केली असल्याने आपलं त्यात मन लागत नव्हतं. आपल्याला पोलिसांना शरण जायचं होतं पण भीती वाटत होती असंही त्याने म्हटलं,” असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पार्टीमधून परतल्यानंतर आपल्या मामाला फओन करुन दरवाजा आतून बंद असून कोणीही उघडत नव्हतं असं सांगितलं. आपण दरवाजा तोडून बहिणीला घेऊन रुग्णालय गाठल्याचा दावा त्याने केला.मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पालकांनी पाच लाख रुपये देण्यास नकार दिल्याने चीड आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, “आरोपींनी पालकांकडे पाच लाखांची मागणी केली होती. पण त्याचं कारण सांगत नसल्याने आई, वडील आणि आजीने त्याला सुनावलं होतं. यामुळे संतापाच्या भरात त्याने हत्येचं पाऊल उचललं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा