Subscribe Us

header ads

आदित्य कॉलेजमधील ओपीडीसह सर्व विभाग पुन्हा जिल्हा रूग्णालयात सुरू होणार!


आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सूचना करताच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग लागले कामाला

रूग्णांची गैरसोय दूर होणार; कोव्हिड, नॉन कोव्हिड रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार

बीड (प्रतिनिधी):- जिल्हा रूग्णालयातील ओपीडी व इतर विभाग कोरोना रूग्ण संख्या वाढल्यानंतर नाळवंडी नाका येथील आदित्य आयुर्वेदीक महाविद्यालयात सुरू करण्यात आले. आदित्यमधील रूग्णालय शहरापासून दूर असल्याने रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. सदर ठिकाणी सुविधांचाही अभाव होता. आता कोव्हिड रूग्णसंख्या कमी होत असल्याने जिल्हा रूग्णालयातच पुन्हा ओपीडीसह सर्व विभाग सुरू करण्यात यावेत, जिल्हा रूग्णालयातील इमारतीमध्ये कोव्हिड, नॉन कोव्हिड असे विभाग करून रूग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात अशी सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांच्याकडे केली.यावेळी माजी आ. सयद सलीम, माजी आ. सुनील धांडे आदी उपस्थित होते.आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने या बाबत प्राथमिक अंदाज घेतल्यानंतर जिल्हा रूग्णालयातील आरोग्य विभागाची यंत्रणा, आदित्यमधील ओपीडीसह सर्व विभाग स्थलांतरीत करण्याच्या प्रक्रियेला लागले आहेत. 
बीड जिल्हा रूग्णालयातच सर्व विभाग सुरू करण्यात यावेत, ओपीडी विभाग व शस्त्रक्रिया विभाग, प्रसुती विभाग वव इतर विभागही जिल्हा रूग्णालयातच सुरू करावे अशी मागणी कोव्हिड रूग्ण संख्या कमी झाल्यानंतर शहरातील अनेकांकडून होवू लागली. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडेही अनेकांनी मागणी केली. आदित्य येथील सिव्हीलच्या विविध विभागात डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाही. स्वच्छता तसेच ओपीडी शहरापासून लांब असल्याने डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपलब्धत होत नसल्याने रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी याबाबत जिल्हा रूग्णालयातील यंत्रणेचा आढावा घेतला. कमी असलेले मनुष्यबळ, जिल्हा रूग्णालयात उपलब्ध असलेली यंत्र सामुग्री व इतर सुविधा याबाबत जिल्हा रूग्णालयातील अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर आदित्य कॉलेजमधील ओपीडीसह सर्व विभाग पुन्हा जिल्हा रूग्णालयात स्थलांतरीत करा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला केला. त्यानंतर जिल्हा रूग्णालयातील आरोग्य विभाग कामाला लागला असून लवकरच या सर्व सुविधा जिल्हा रूग्णालयात सुरू होणार असल्याने रूग्णांची होणारी गैरसोय टळणार असल्याचे दिसते. त्याचबरोबर जिल्हा रूग्णालयातच कोव्हि आणि नॉन कोव्हिड असे दोन विभाग करून रूग्णांवर उपचार केले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा