Subscribe Us

header ads

आठवडी बाजार सुरू करा विज,रस्ता, पीक नुकसान भरपाई देया या साठी नेकनुर मध्ये रास्तारोको आंदोलन

नेकनूर/ ग्रामीण भागाच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या आठवडी बाजाराला ब्रेक लागल्यामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे व्यवसाय बंद पडले असून प्रशासनाने आठवडी बाजार सुरू करावा यासह संतगतीने सुरू असलेले अहमदपुर – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावेत , महावितरणचा गलथान कारभार सुधारण्यात यावा यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी रविवारी नेकनूरमध्ये रास्तारोको आंदोलन करण्यात आले . या आंदोलनामुळे तासभर महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन वर्षापासून आठवडी बाजार भरविण्यास बंदी घालण्यात आली आहे . ग्रामीण भागाचा अर्थचक्र असलेला आठवडी बाजार बंद असल्याने हजारो छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत . त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडलं आहे . त्यामुळे आठवडी बाजार भरविण्यास परवानगी देण्यात यावी , त्याच बरोबर अहमदपुर – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . या त्रासातून मुक्तता करण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे , वीजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे .पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतामध्ये पाणी आणि गवत वाढल्यामुळे सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून माणसांच्या जिवीताला धोका निर्माण होवू शकतो त्यामुळे महावितरणचा गलथान कारभार सुधारावा , त्याच बरोबर गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे . त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीची भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांसाठी रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नेकनूरजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात नेकनूरसह परिसरातील जवळपास आठ ते दहा हजार लोक सहभागी झाले होते.आंदोलन शेतकरी व व्यापारी यांच्यासह जितेंद्र शिंदे आणि डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . अहमदपुर – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते . तासभर झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या . तासानंतर आंदोलनस्थळी पोहचलेल्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारत आश्वासन दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा