Subscribe Us

header ads

‘त्या’ पिडीत युवतीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार; उद्या सोनपेठ बंद!

‘त्या’ पिडीत युवतीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार; उद्या सोनपेठ बंद

सोनपेठ,दि.21(प्रतिनिधी) : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील अत्याचाराने बळी गेलेल्या अल्पवयीन युवतीवर मंगळवारी (दि.21) सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लातूर येथील रुग्णालयात या युवतीचा सोमवारी (दि.20 सप्टेंबर) रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्या प्रकाराने तीचे कुटूंबिय अक्षरशः हादरले. डिघोळ तांडा या गावावरसुध्दा काल रात्रीपासून मोठी शोककळा पसरली. मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर त्या युवतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, सोनपेठ शहरात या युवतीवर तीघा नराधमांनी केलेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ बंजारा समाज बांधवांनी सोनपेठ बंदचे आवाहन केले आहे. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, कनिकराम नाईक, गोैर सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राजेश राठोड, बंजारा क्रांती दलाचे मारोती पवार, श्रीराम राठोड यांच्यासह अन्य नागरीकांनी एका निवेदनाद्वारे व्यापारी बांधवाना आवाहन केले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेसुध्दा या प्रकरणाच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले आहे. आरोपीस मदत करणार्‍या व्यक्तीविरुध्दही कठोर कारवाई करावी, राज्य सरकारने या प्रकरणात पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे तपास सुपूर्द करावा, सरकारी वकील म्हणून विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, जलदगतीच्या न्यायालयात हे प्रकरण दाखल करावे, अशी मागणीही शहराध्यक्ष सुशिलकुमार सोनवणे, कचरुबा मुंढे, हनुमंत पंडीत, रामेश्‍वर पंडीत, रुस्तुम तुपसमुंदे आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा