Subscribe Us

header ads

पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून आरोग्य व्यवस्थेस बळकटी; बीड जिल्हा आरोग्य यंत्रणांना आणखी 43 रुग्णवाहिका!


बीड (दि. 21) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्याच्या उद्दिष्टातून आरोग्य विभागाच्या मार्फत जिल्हा आरोग्य यंत्रणेस 43 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या 8 ते 10 दिवसात या रुग्णवाहिका जिल्ह्यात दाखल होणार आहेत. 
बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागास (प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी) 31 आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये व ट्रामा केअर सेंटर्सला मिळून 12 अशा एकूण 43 रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.बीड जिल्ह्यात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटे दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेस 15 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी रुग्णवाहिकांची निकड व मागणी लक्षात घेत ना. धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती बजरंग बप्पा सोनवणे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार बीड जिल्हा आरोग्य विभागास नवीन अद्ययावत व सर्व सुविधायुक्त 43 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या असून आठवडाभरात त्या बीड जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आरोग्य मंत्री ना. राजेशभैय्या टोपे व आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा