Subscribe Us

header ads

कोरोनाबाधित पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीची ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या

सोलापूर_कोरोनाबाधित पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या तासाभरातच पत्नीनेही धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी सोलापुरात ही घटना घडली.मंगळवेढा येथील शरद नगरात राहणारे आप्पासाहेब रावसाहेब मोरे (वय ३९) हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांना सोलापूरच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. परंतु शर्थींचे प्रयत्न करूनही अखेर बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी प्रियांका (वय ३२) या रूग्णालयातच पतीच्या सोबत सेवेसाठी थांबल्या होत्या. पतीचे निधन झाल्याचे कळताच प्रियांका यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर अवघ्या तासाभरातच त्या तडक रूग्णालयाबाहेर जाऊन जवळच्या रेल्वेरूळावर गेल्या आणि धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या दुर्घटनेमुळे त्यांचा सातवीच्या वर्गात शिकणारा एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा