Subscribe Us

header ads

राष्ट्रीय लोकन्यालयात पती पत्नीमध्ये दुभंगलेली मने पुन्हा जुळली

बीड,दि.29(जि.मा.का.):- बीड जिल्हा न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध प्राप्त प्रकरणामध्ये तडजोडीने निकाली काढण्यात आले. त्यामध्ये पती पत्नीमधील वाद कोर्टाच्या पायरीपर्यंत जाऊन पोहाचला की त्यांच्यामध्ये समेट घडवून आणने खुपच कठीन होऊन जाते. वाद पती पत्नीचा असतो. दोघांचे पटत नाही म्हणून दोघे एकमेकांपासून विभक्त राहतात परंतु याचे परिनाम मत्र त्यांच्या लहान आपत्याना विनाकारण भोगावे लागतात. त्या लाहनग्यांचा त्यामध्ये कोणताही दोष नसतो. परंतू त्यांना आई वडीलापैकी एकाच्या प्रेमापासून व सहवासापासून पारखे व्हावे लागते. न्यायालयामध्ये पोहचलेल्या वादामध्ये जस जशा पुढील तारखा पडत जातात. तस तसे पती पत्नीची मने एकमेंकाबाबत दुभंगत जातात. त्यांना एकत्र आणन्याचा विविध मार्गानी प्रयत्न केला जातो पती पत्नी समजदार असतील तर विकोपाला गेलेला वाद देखील सामजशाने मिटविता येतो. अशाच प्रकारचा एक 


अत्यंत विकोपाला गेलेला वाद बीड येथे दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयासमोर समझोता करण्यासाठी कौंटुंबिक न्ययालयाच्या न्यायाधिश श्रीमती सानिका जोशी मॅडम यांनी पाठविला होता. सदर लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख न्या. आर.एस.पाटील व पॅनल वरील सदस्यानी त्यामध्ये यशस्वीपणे तडजोड घउवुन आणली आणि पती पत्नीची दुभंगलेली मने पुन्हा एकदा जुळवली आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा शुभम याला आई वडिलांचे प्रेम मिळवुन दिले.संतोष व मोनाली यांचा विवाह सन 20216 मध्ये बीड येथे झाला. त्यांच्या विवाहबंधनातुन एक पुत्ररत्न झाले त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. दोघांचे वाद अत्यंत विकोपाला गेले. दि. 3 एप्रिल 2018 पासून मोनाली ही तिच्या माहेरी आईवडिलांकडे राहू लागली. दोघांनाही एकमेकासोबत रहायचे नाही असे ठरवून आपसात संमतने न्यायालयातुन घटस्फोट घेण्याचे ठरविले. सन 2020 मध्ये दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्यासाठी बीड येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. नेमलेल्या तारखेवर पती पत्नी हजर राहील नाही म्हणून पतीने सदरचा अर्ज मागे घेतला.त्यानंतर पत्नीने बीड येथिल कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंदु विवाह कायद्याप्रमाणे क्रुर वागणूक देऊन घरातुन हाकलून दिल्याच्या कारणावरुन घटस्फोट मिळण्यासाठी पतीच्या विरुध्द अर्ज केला. सदर प्रकरणामध्ये सुनावणी झाली असती व पत्नीचा सदर अर्ज न्यायालयाने मंजूर केला असता तर त्यांच्यामध्ये फारकत झाली असती. पती पत्नी दोघेही एकमेकांपासून कायमचे विभक्त झाले असते. चार वर्षाचा शुभमला आपल्या वडिलांचा सहवास व प्रेम मिळाले नसते. परंतू कौंटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती सानिका जोशी यांनी त्यांचा संसार पुन्हा जुळावा या अत्यंत चागल्या हेतुन त्यांचे प्रकरण लोकन्यायालयाकडे पाठविले. लोकन्यायालयासमोर त्यांच्यामध्ये समझोता झाला. मोनाली पुन्हा संतोषकडे नांदायला जाण्यास तयार झाली. संतोषने देखील मोनालीला आपल्य घरी घेऊन जाण्यास तयार झाला. दोघेही एकविचाराने राहतील असे दोघांनाही लोकन्यायालयाच्या पॅनलला सांगितले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश हेमंत शं. महाजन यांनी स्वत:पॅनलच्या ठिकाणी येऊन दोघांना गुलाब पुष्प देऊन दोघांचे अभिनंदन केले व पुढील सुखी संसारासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे पती पत्नीमध्ये दुभंगलेली मने पुन्हा जुळली आणि दुभंगलेला संसार पुन्हा जुळला दोघानिही लोकन्यायालयाच्या पॅनलचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा