Subscribe Us

header ads

सेवानिवृत्त सैनिक सुभेदार प्रभाकर पवार यांचा सत्कार संपन्न

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड (प्रतिनिधि)  मातृभमीच्या संरक्षणासाठी भारतिय सेनेच्या 7 महार बटालियन मध्ये 28 वर्षे सेवा देऊन सुभेदार या पदावरुन आयु. प्रभाकर पवार हे दि. 31 आँगष्ट रोजी यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाले. सुभेदार प्रभाकर पवार हे उक्कडपिंपरी ह.मु. कालिका नगर, बीड. येथील रहिवाशी असुन सेवानिवृत्ती नंतर आजच दि. 5 सप्टेंबर 21 रोजी त्यांचे बीड येथे आगमन झाले.  एका देशभक्त, भूमिपुत्राचा यथोचित सत्कार, सम्मान करने हे आपले कर्तव्यच बनते. म्हणुन सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ कार्यालय, धानोरा रोड, बीड येथे हा छोट्याखानी सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा से. नि. मुख्याध्यापिका आयु. सुमनताई लक्ष्मण गायकवाड तर प्रमुख पाहुणे  (से.ब.अ-क. महासंघ जील्हा अध्यक्ष) कँप्टन राजाभाऊ आठवले, प्रा. बी. पी. सिरसट, आयु. एस.ए.सोनवने,  आयु.जी.एम.भोले जील्हा सचिव यांची प्रमुख उपस्थिति होती. या प्रसंगी सैनिकांचा त्याग, समर्पण व देशसेवेचा जज्बा आणि धाडस उराशी बाळगुन निसर्गाच्या विपरित परिस्थितित, सिमेवरील तनाव, आणि आतिरेक्यांशी झुंज देत असताना प्रत्येक क्षण मृत्युच्या जवळ असतो. अशा परिस्थितितुनही देश संरक्षणाचे 28 वर्षे सेवा करुन सुखरुप घरी यणे म्हणजे त्यासैनिकाचा पुणर्जन्मच होय! असे याप्रसंगी भावपूर्ण उदगार कँप्टन राजाभाऊ आठवले यांनी काढले. शूरवीर सुभेदाराचा मोठ्या थाटामाटात तोफा, फटाके व पुष्प उधळुन, शाल-पुष्प बुके व पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले. आता सुभेदार यांनी आपल्या आई-वडिलांची सेवा व कुटुबांची काळजी घेउन समाजसेवेत उर्वरित जीवन आपण समाजाचे काही देने लागतो या भावनेतून व्यतित करावा. याकरिता त्यांना पुढील आयुष्य निरोगी, सुदृढ व समाजोपयोगी कार्य करण्यास मंगलमय शुभेच्छा दिल्या. सत्कारमुर्ती सुभेदार प्रभाकर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या सैनिकी जीवनातील अविस्मरणीय क्षण सांगुन सर्वांना भारावून टाकले.  कँप्टन आठवले यांनी व्यक्त केलेल्या समाजसेवेला वाहुन घेण्यासाठी तत्पर निर्णय घेउन सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे सभासदत्व स्विकारले. ह्या निर्णयाचे सर्व उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले. कार्यक्रमास माझी सैनिक आयु.विलासराव चक्रे, बाबासाहेब घोडके, काशीनाथ वाघमारे, दादाराव गायकवाड, डाँ. किसनराव साळवे, डी. जी. वानखेडे, गायकवाड के. बी., गायकवाड डी. ए., सुधाकर विद्यागर (नाना),आशाताई विद्यागर, गायकवाड सुभाष, सातपुते बंडु, पवार बाबासाहेब, बहिरवाल आशोक, अँड. के. आर. गाडे, सरवदे आनंतराव व बहुसंख्य सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या सभासदांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयु. जी.एम.भोले सर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा