Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडी बीड मध्ये इन्कमिंग सुरू...रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम वीर , उद्धव खाडे यांनी केला प्रवेशभव्य मोटारसायकल रॅली काढून सुरुवात..





पुरुषोत्तम वीर व उद्धव खाडे माजी सरपंच गडी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह  वंचित मध्ये प्रवेश

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड शहताती धडाडीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा सत्य सत्य क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, पुरुषोत्तम वीर  व गडी चे माजी सरपंच यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये वाजत गाजत प्रवेश केला त्यांच्या पक्ष प्रवेशाचे वैशिष्ट्य असे की या बीड शहरातील दीडशे कार्यकर्त्यांमध्ये २५ मुस्लिम महिला व  १०० वर युवक तरुणांनी पक्षप्रवेश केला, यांच्या पक्ष प्रवेशाला निश्चितपणे शहरातील संघटनात्मक बांधणी बळकटी प्राप्त झाली आहे. उद्धव खाडे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागातील संघटन बांधणी साठी मोठी फळी पक्षाला मिळाली आहे.

बीड प्रतिनिधी/ दि. ०४ बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी अध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांनी मराठवाड्याच्या दौर्‍यावर दिनांक २८ऑगस्ट पासून सुरुवात केली  आज त्याचा समारोप  दि. ४ सप्टेंबर २०२१  रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड, जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी च्या संघटना समीक्षा  मेळावास  च्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यास प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर उपाध्यक्ष गोविंद दळवी पक्षप्रवक्ते  फारूकु अहमद व मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अशोक  हिंगे पाटील यांच्यासह महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती  सिरसाठा सवितताई मुंडे, बीड लोकसभेचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव गेवराई  विष्णू देवकते, वैभव स्वामी, रमेश गायकवाड, डॉ नितीन सोनवणे,अनिल डोंगरे, खंडु जाधव, बालाजी जगतकर भगवंत वायबसे, शैलैश कांबळे,अनंतराव सरवदे,संतोष जोगदंड, डॉ.गणेश खेमाडे, देविदास बचुटे,अंकुश जाधव, मिलिंद धाडगे,भारत तांगडे,सुदेश पोतदार, डॉ.सोमवशी,सचिन मेघडंबर, ज्ञानेश्वर कवठेकर,अजय सरवदे,पुष्पाताई तुरुकमारे, संजय गवळी, गौतम साळवे, बाळासाहेब गायकवाड,गोरख झेंड, दिलीप माने,मनोहर औसरमल,आमोल साखरे, गणेश वीर, युनूस शेख, विश्वजीत डोंगरे,राजू कोठेकर, लखन जोगदंड, संदीप जाधव‌,किरण वाघमारे, ऋषिकेश वाघमारे, श्रीकांत वाघमारे, किशोर भोले, 
समिक्षा संधटण व संवाद मेळाव्यास संबोधित करताना  फारूकु अहमद यांनी असे प्रतिपादन केले की महाराष्ट्रामध्ये संख्येप्रमाणे ३० ते ३५ आमदार निवडून यायला हवेत, अकरा ते बारा ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिल्यास परंतु लक्ष्मी मते घेऊन सुद्धा काही मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला परंतु मुस्लिम समाज आज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहे. कारण मागील महिन्यातील पाच तारखेचा मोर्चा प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित करून मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबत शासनाकडे आग्रही मागणी करण्यात आली या आरक्षणास कोणाचाही विरोध नाही तसेच हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार मुस्लिमांचं निर्विवाद आरक्षण त्याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही म्हणून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे. गोविंद दळवी यांनी संघटनात्मक बांधणी ची व्याख्या सांगून कार्यकर्त्यांच्या कानउघडणी केली पदापेक्षा कामाला महत्त्व द्या हे पद आज आहे उद्या नाही परंतु, पक्षाचा अजेंडा महत्त्वाचा आहे आणि त्या शिवाय स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी धोरणाच्या विरुद्ध कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. या मेळाव्याची समारोपाचे भाषण करताना ठाकूर यांनी बाळासाहेबांच्या पस्तीस वर्षाच्या राजकारणाचा तपशीलवारपणे आढावा दिला. त्या म्हणाल्या या महाराष्ट्रामध्ये जोशी त्यांना सर्व अठरा पगड जातीच्या वंचित शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी हीच सक्षम आहे येणाऱ्या कालखंडामध्ये काँग्रेस भाजप सेना यापेक्षा वंचित आघाडी आघाडी वंचितांना न्याय देतील याप्रसंगी त्यांनी तमाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित चा झेंडा या दृष्टीने बांधणी केली.
मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी बोलताना  अँड. बाळासाहेब आंबेडकर  हेच  पहिल्या पासुन  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही भुमिका मांडली आहे, प्रस्तापीत पक्षाला‌ घराणेशाहीचे राजकारण करून भाऊ, बहीण, काका, पुतण्या, मोठं करत आहेते त्या मुळे सर्वसामान्य लोक वंचित कडे आकर्षक झाले आहेत.येथील मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न झाला त्यांची सुरुवात मोटरसायकल  रॅली काढून करण्यात मेळाव्याचे बहारदार,सूत्र संचलन यांनी केले बबनराव वडमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवंत आप्पा वायबसे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा