Subscribe Us

header ads

तेलगाव नाका गांधीनगर परिसरात घरामध्ये पाणीच पाणी बीड शहराच्या विकास पुरूषाने जरा डोळे उघडून पाहावे-- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी


आम आदमी पार्टीच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रशासनाच्या व जनप्रतिनिधींच्या निदर्शनात आणून दिले-- सय्यद सादेक शहराध्यक्षआम आदमी पार्टी

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड-: आम आदमी पार्टीच्या साप्ताहिक स्वच्छता मोहिमेदरम्यान आज तेलगाव नका गांधीनगर या भागांमध्ये नागरिकांनी बोलावले असता तेथील नागरिकांची अवस्था पाहता असे वाटले हा भाग बीड शहरातील सर्वात उंचावर असणारा भूभाग आहे तरी या भागामध्ये फक्त आणि फक्त नगरपालिका प्रशासन जनप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे या नागरिकांना त्रास भोगण्यासाठी यांच्या निर्लज्जपणा मुळे व दुर्लक्षामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचे काम ही बीड नगरपालिका करत आहे येणाऱ्या काळामध्ये जनते मधला रोष बघता जर वेळेवर जाग आली नाही तर याचा परिणाम नगरपालिका व दशको, दशक सत्ता भोगत असलेले जनप्रतिनिधी म्हणून मिरवत असलेले वर्षानुवर्ष विकास पुरुषाचा दिंडोरा घेऊन पाठीवर थाप मारून घेणारे यांना येणारा काळामध्ये येथील नागरिक नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत या मोहिमेदरम्यान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर प्रमुख सय्यद साधक जिल्हा सचिव रामदासजी जमाले रामभाऊ शेरकर मीडिया प्रमुख तसेच शेख वजीर पठाण प्राध्यापक ज्ञानेश्वर राव अभिषेक टाळके व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा