Subscribe Us

header ads

पालकमंत्री धनंजय मुंडे गुरुवारी बीड जिल्हा दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या नुकसानीची बांधावर जाऊन करणार पाहणी


आष्टी, गेवराई, वडवणी, बीड तालुक्यात करणार नुकसानीची पाहणी

बीड (दि. 01) ---- : बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसात अति पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे गुरुवारी बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते जिल्ह्यात पावसाने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौर्‍यात स्थानिक आमदार प्रकाश दादा सोळंके संदीप भैया शिरसागर बाळासाहेब आजबे काका हेही सोबत राहणार आहेत.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे सकाळी 10 वाजता व त्यानंतर शेडळा, सावरगाव त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील गंगावाडी, तलवाडा, रामनगर, राजरी मळा, बीड तालुक्यातील पोखरी, घटसावळी, वडवणी तालुक्यातील चिंचवण आदी ठिकाणी पाहणी करणार आहेत.शेतीतील खरीप पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. यासाठी महसूल प्रशासन, कृषी विभाग तसेच भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या समनव्यातुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा