Subscribe Us

header ads

मोदी सरकार चे अच्छे दिन!


बीड-:आज मोदी सरकारने घरगुती ग्यासचा भाव फक्त २५ रुपयांनी वाढवला म्हणून लगेच काही अशांत आत्मे कोकलू लागलेत. सहाजिकच आहे म्हणा, कॉंग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत यांना जी फुकट खायची सवय लावलीय ती अशी आठ दहा वर्षांत जाणे मुश्कील आहे. यांना वठणीवर आणायला मोदीजी किमान पंचवीस वर्षे तरी सत्तेवर रहायला हवेत. ग्यास दरवाढीच्या नावाने बोंबलणारे हा विचार करत नाहीत की हल्ली ग्यास किती नितळ आणि शुद्ध येतो ! त्यात जराही भेसळ दिसत नाही. पूर्वी कॉंग्रेसच्या काळात म्हणे त्यात नायट्रोजन मिसळायचे. खरे खोटे त्या इटालियन बाई जाणोत. मला आठवतंय, आधी आंघोळीसाठी एक मोठे भांडे पाणी तापवायचे तर तब्बल दहा मिनिटे लागत. हल्ली जेमतेम दोन ते तीन मिनिटांत पाण्याला अक्षरश: उकळी येते. खोटे वाटत असेल तर एकदा पाणी तापवून बघा म्हणजे लक्षात येईल. ग्यासची थोडीफार भाववाढ झालीय हे अगदी मान्य आहे परंतू क्वालिटी देखील प्रचंड प्रमाणात सुधारलीय त्याकडेही पहायला हवे. मारुती अल्टोच्या भावात मर्सिडिस कशी मिळेल? मर्सिडिसची क्वालिटी पाहिजे तर तसे पैसे मोजावेच लागतात हा साधा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. अर्थात गुलामांच्या लक्षात या गोष्टी येणे कठीणच आहे म्हणा. आता येत्या काही दिवसांत तुम्हाला ग्यास दरवाढीबद्दल भरपूर कोल्हेकुई ऐकू येईल पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा आणि मोदीजींच्या पाठीशी ठाम उभे रहा. लोक तुम्हाला सांगतील की लवकरच ग्यासचा भाव १५०० रुपये होईल. पण तुम्ही अजिबात भिऊ नका. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तर द्या, म्हणा, 

‘एकवेळ गवत खाऊन राहू पण मोदींनाच निवडून आणू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा