Subscribe Us

header ads

मुलाने आईच्या गळ्यावर धारदार विळ्याने केला वार नंतर मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

जन्मदात्या आई वर धारदार चाकूने वार करत घाबरलेल्या मुलाने शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथे आज दुपारी घडली जखमी आईची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या बाबत अधिक असे की. माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील कदम कुटूंबातील पारुबाई कदम व तिचा 30 वर्षीय मुलगा बापू कदम या मायलेकरात घरगुती कारणावरून वाद सुरु झाला संतापलेल्या बापूने आईच्या गळ्यावर धारदार विळ्याने वार केला पारुबाई गंभीर जखमी झाल्याने भेदरलेल्या बापूने शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. यातील पारुबाई गंभीर जखमी आहेत त्याच्यावर बीड येथे उपचार सुरु आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा