Subscribe Us

header ads

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या कटामागील सूत्रधारांनाना तात्काळ अटक करा; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.


अंबाजोगाई : (दि.20ऑगष्ट) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तथा कार्याध्यक्ष शहीद  डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत शिक्षा करून हत्येमागील सूत्रधारांना अटक करा  या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे  आज डाॅ.दाभोळकरांच्या स्मृतीदिनी प्रशासनाला निवेदन  देण्यात आले.याबाबत सविस्तर वृत असे की, डॉ नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंतही मारेकर्‍यांना सजा झाली नाही किंवा त्यामागील सूत्रधार पकडले गेले नाहीत. हे अतिशय वेदनादायी व तीव्र संताप आणणारे आहे.  त्यामुळे हत्येमागील सूत्रधार पकडावेत तसेच तपासातील दिरंगाई थांबवावी या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे मा.पंतप्रधान,मा.मुख्यमंत्री यांना उपविभागीय दंडाधिकारी   मा.शरद झाडगे यांचेमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कार्यवाह मनोहर जायभाये ,बीड जिल्हा प्रधान सचिव सुधाकर तट,कार्याध्यक्ष प्रदिप चव्हाण,श्रीमती रेखा देशमुख, सूर्यकांत तेलंग, कु.तेजल शितोळे, घोडके सर इ.महाअंनिसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा