Subscribe Us

header ads

सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला २० धावांनी मात दिली

भारतात पार पडलेल्या पूर्वाधातील पराभवाचा वचपा काढत चेन्नई  सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर २० धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.

(मुंबईचा डाव)

मुंबईकडून पदार्पणवीर अनमोलप्रीत सिंग आणि  क्विंटन डी कॉक यांनी सलामी दिली. आक्रमक सुरुवात केलेल्या क्विंटन डी कॉकला दीपक चहरने पायचित पकडले. डी कॉकने १७ धावा केल्या. दीपक चहरने सुंदर फटके खेळलेल्या अनमोलप्रीतची दांडी गुल करत त्याला तंबूचा मार्ग दाखवला, अनमोलने १६ धावा केल्या.  सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या हे स्टार फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. सौरभ तिवारीने ५ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होने २५ धावांत ३ बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. दीपक चहरने २ बळी घेत ब्राव्होला उत्तम साथ दिली.

(चेन्नईचा डाव)

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांनी तिखट मारा करत चेन्नईची पहिल्या पॉवरप्लेमध्ये अवस्था ४ बाद २४ अशी केली. डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ऋतुराज आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ऋतुराजने आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जडेजाला झेलबाद करत ही भागीदारी तोडली. गायकवाड-जडेजा यांनी ८१ धावांची भागीदारी केली, जडेजाने २६ धावा केल्या. त्याच्यानंतर ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी मैदानात आला. ७ चेंडूत २३ धावांची खेळी करून ब्राव्हो शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने ३ षटकार ठोकले. ऋतुराजने ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा ठोकत चेन्नईला २० षटकात ६ बाद १५६ धावा अशी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ५६ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा