Subscribe Us

header ads

राक्षसभुवन ( देवीचे ) येथे ना पीकाला कंटाळुन शेतकऱ्यांची आत्महत्या


प्रतिनिधी नवनाथ गोरे
🔶🔷🔶🔷🔶🔷

वाकनाथपुर प्रतिनिधी_अतिवृष्टी झाल्याने सर्व पिके पाण्यात गेली शेतीत गेलेला खर्च ही निघत नाही या  कारणाने बीड जिल्ह्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी  राक्षसभुवन ( देवीचे )ता बीड येथील अशोक व्यंकट मस्के (वय ३७) वर्ष या शेतकऱ्याने अतिवृष्टी झाल्याने पीक सर्व वाया गेल्याने शेतीच्या बीयानासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे ऊसतोडीचा सुद्धा पैसा सर्व जाऊन देखील कर्ज फिटत नाही या नैराश्यातून रात्री नऊ च्या दरम्यान लिंबाच्या झाडाला कमरेच्या बेल्ट च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही माहिती पिंपळनेर पोलीस यांना होतच घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे बीटअमलदार औवचर साहेब. आणि वणवे साहेब हे घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा केला असुन मयताच्या खिशात एक चीठी आढळून आली आहे. चिठी मध्ये मयताने असे लीहले आहे. की मी नापिकाला कंटाळुन आत्महत्या करत आहे. माझ्या मुलाला सांभाळा अशा चीठीतील मजकुर पिंपळनेर पोलीस यांनी पांचासमोर वाचून दाखवला आहे. येथील प्रकिया पूर्ण करून मयत अशोक व्यंकट मस्के यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मयताच्या पच्छात आई,वडील पत्नी, अठरा वर्षाचा मुलगा आणि चौदा वर्षांची मुलगी असा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा