Subscribe Us

header ads

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेत घोटाळा करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा-- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड_बीड आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले की शहर व तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर बदल करून नोंदीची खाडाखोड करून तसेच तलाठ्यांनी आर्थिक लागेबांधे सांभाळून दिलेले चुकीचे कागदपत्रे याबाबत तपासणी करून तात्काळ चौकशी करावी यामध्ये दोषी असणारे अधिकारी कर्मचारी व इतरत्र राजकीय दबावतंत्र वापरून दोषी असणारे यांच्यावर कारवाई करावी अवैध मंजुरीसाठी जे शासकीय अशासकीय सदस्य दबाव आणत असेल तर संबंधित सदस्यांना बरखास्त करून योग्य ती कारवाई करावी पात्र निराधार अपात्र होतात आणि अपात्र निराधार पात्र होतात योजनेची खैरात हे अतिशय चुकीचे असून चुकीच्या माणसांना लाभ भेटत आहे तो योग्य त्या लाभार्थ्यांना भेटला पाहिजे तो भेटताना दिसत नाही जर यावर येणाऱ्या सात दिवसात योग्य तो निर्णय घ्यावा व दोषींवर ती कारवाई करण्यात यावी असे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेल यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामधन जमाले, जिल्हा संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, प्रा. संदीप घाडगे, महेश शिंगारे, शहर प्रमुख सय्यद सादेक, इत्यादी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा