Subscribe Us

header ads

गर्भवती बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती

अमरावतीमध्ये अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. बलात्कारानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं.पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. सर्वसाधारण कुटुंबातील या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. (१७) वर्षीय पीडित मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या प्रकरणात सदर मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब तिच्या पालकांना समजली नव्हती, मात्र आत्महत्या झाल्यावर रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात मृत युवती सात महिन्यांची गर्भवती असल्याचं पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी यासंबंधात संशयित आरोपी असलेल्या मुलाकडे चौकशी केली, मात्र त्याने असं काहीही झाले नसल्याचे म्हणत हात वर केले. या प्रकाराने धक्का बसून पीडित मुलीने २९ ऑगस्टला रात्री गळफास लावून आत्महत्या केली. मात्र याबाबतची तक्रार काल शुक्रवारी पोलिसात दाखल झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा