Subscribe Us

header ads

माजलगावात जेष्ठ नागरिक धोरणाची अमलबजावणी करण्यासाठी सुरुवात



माजलगाव प्रतिनिधी:-राज्यात जेष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतुद भारताच्या संविधानामध्ये असतांना शासन निर्णयानुसार माजलगावात ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नुकताच सर्वे सुरू झाला असून सय्यद लतीफ यांच्या प्रयत्नाने इदगाह मोहल्ला परिसरात सय्यद लतीफ यांनी अधिकाऱ्याला घरोघरी घेऊन जाऊन ह्या योजनेचा लाभ सर्व जेष्ठ नागरिकापर्यंत  पोहचावा व सर्वांची नोंदणी व्हावी यां उदान्त हेतूने येणाऱ्या अधिकाऱ्याला सहकार्य करीत संपूर्ण इदगाह परिसरातील जेष्ठ नागरिकांनी नोंदणी करावी व या योजनेचा लाभ सर्वांना सांगून गेल्या दोन दिवसांपासून सय्यद लतीफ यांनी अधिकाऱ्यांसोबत स्वतः फिरून नोंदणीला सुरुवात केली आहे. व सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे. समाजातील जेष्ठ नागरिकांचे स्थान लक्ष्यात घेता त्यांना वृद्धापाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा समाजामध्ये त्यांचे सुसह्य व्हावे,शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धपकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता,कामाचा हक्क व सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्य शासनाने जेष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्यामध्ये विविध बाबींचा समावेश आहे.या योजनेचा लाभ ६० वर्ष्यापासून पुढील जेष्ठ नागरिकाना मिळणार आहे. त्यामध्ये नोंदणी केलेल्या जेष्ठ नागरिकांना गंभीर आजार,आजारपणाचे वेळीच निदान व्हावे व आजारपण होवू नये म्हणून प्रतिबंधक योजना,रुग्णालयामध्ये जेष्ठ नागरिकांना साठी ५% खाटानची सोय, वैद्यकीय सेवा, आंबूलन्स सेवा उपलब्ध करून देणे,खाजगी रुग्णालयात ५०% फी मध्ये सवलत अश्या भरपूर योजनेचा समावेश ह्या जेष्ठ नागरिक धोरणामध्ये होणार असून यामध्ये शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी आपले नाव द्यावे जेणेकरून पुळे या योजनेचा लाभ घेता यावा असे सय्यद लतीफ यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा