Subscribe Us

header ads

बीड शहरामध्ये घाणीचे साम्राज्य करणाऱ्या नगरपालिकेची मुख्यमंत्र्यांना भेटून शिकायत करणार.--- अशोक येडे जिल्हाध्यक्ष अप

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

शहराची स्वच्छता करण्यासाठी दिलेल्या कंपनीला पाठीशी घालणारे जनप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करा--- सय्यद सादेक शहर अध्यक्ष आप 



बीड _बीड शहराला बीड नगरपालिका विद्रूप करण्याचं काम करत आहे बीड बस स्थानका समोर रोड वरती संपूर्ण घाणीचे साम्राज्य आहे बीड बस स्थानकाच्या चारी बाजूने कचऱ्याचे ढिगारे असून ते दहा दिवसापासून उचलण्याचे काम बीड नगर पालिकेने ज्या कंपनीला कचरा उचलण्याचे टेंडर दिले आहे ती कंपनी शहरांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य झालेले असून बिलकुल कचरा उचलण्याचे काम करत नाही  नगरपालीकेमधील जनप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी याकडे बिलकुल लक्ष देत नाहीत आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन निवेदनाद्वारे कळवून त्यावर ती कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही ज्या कंपनीसोबत स्वच्छतेचा नगरपालिकेने करार केलेला आहे ती कंपनी काहीच काम करत नाही त्यावरती नगरपालिका प्रशासन कानाडोळा करत आहे आणि शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचं काम ही नगरपालिका करत आहे शहरामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढलेले असून मलेरियाचे वाढलेले आहे हे सर्व पाहता याकडे कुठेही नगरपालिका फवारणी करताना दिसत नाही कचरा उचलताना दिसत नाही जिथे  थोडेबहुत उचलले गेले तर जिथे मिळेल त्या मोकळ्या जागेत तिथे कचरा टाकण्याचे काम करते व नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालते या सर्वांना कारणीभूत फक्त आणि फक्त  बीड नगरपालिकाच आहे ज्या कंपनीला स्वच्छतेचे टेंडर दिले गेले ती कंपनी नियमा प्रमाणे काम करताना दिसत नाही या लोकांवरती  कारवाई झाली पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीचे बीड शहरातील विविध मुद्द्यांना घेऊन एक डेली केशन लवकरच जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे व बीड शहरामध्ये होत असलेला भोंगळ कारभार प्रशासनाला अंधारात ठेवून मुख्यमंत्र्यांना मिस गाईड करून काही लोकांनी बीड शहरामध्ये अनावश्यक कामावरती खर्च करून जनतेचे अतोनात नुकसान केले आहे अशा लोकांची शिकायत करणार आहे आज बीड शहरांमधील भाजी मंडळ असो बस स्टँड असो शहरातील गल्ली बोळात मध्ये असो जिथे तिथे घाणच घाण आहे या सर्व गोष्टींना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आज या मोहिमेमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहराध्यक्ष सय्यद सादिक जिल्हा सचिव रामधनी जमाले व इतर नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा