Subscribe Us

header ads

शिवसेनेच्या उप प्रमुखास मारहाण प्रकरणी बाळासाहेब गुंजाळ यांना अटक

बीड-: शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हनुमान जगताप यांना मारहाण प्रकरणी बाळासाहेब गुंजाळ यांना अटक करण्यात आली आहे . सदरील गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असून यात दोन आरोपी अगोदरच अटक करण्यात आली आहेत . एल सी बी चे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केली आहे.सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके करत आहेत .हनुमान जगताप यांना प्रचंड मारहाण केल्या प्रकरणी जिल्ह्यात खळबळ उडाली होती सदरील प्रकरणी तपास होऊन मुख्य सूत्रधार शोधावा अशी मागणी जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी केली होती . सदरील प्रकरणी आणखी काही आरोपी मोकाट असल्याचे देखील बोलले जात आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा