Subscribe Us

header ads

आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमने सामने

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आणि सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ संध्याकाळी साडेसात वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आमनेसामने असतील. गुणतालिकेच पंजाब सातव्या तर राजस्थान सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाने सुरुवात करावी लागेल.
आयपीएलच्या इतिहासात एकूण २२ वेळा पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले आहेत. यात पंजाबने १० वेळा तर राजस्थानने १२ वेळा विजय मिळवला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात पंजाबने राजस्थानला मात दिली होती.

पंजाब किंग्जकेएल राहुल (कप्तान आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल/एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, शाहरुख खान, आदिल रशीद, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस आणि मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्सएविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), रियान पराग, शिवम दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी आणि तबरेज शम्सी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा