Subscribe Us

header ads

दोन्ही क्षीरसागर यांना नगर पालिकेतुन हद्दपार करण्यासाठी तीसरी आघाडी स्थापन करणार--- धम्मानंद वाघमारे



 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड प्रतिनिधी/दि.१२मागील अनेक वर्षापासून बीड नगरपालिकेवर क्षिरसागर कुटुंबीयांची एक हाती सत्ता असताना देखील बीडच्या विकासामध्ये तीळमात्रही बदल झाला नाही बीडमध्ये क्षिरसागर कुटुंबीय बीडच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास असक्षम ठरले असून त्यांना पराभुत करण्याकरिता बीड मधील क्षीरसागर विरोधी भूमिका घेणाऱ्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांन समवेत बीडमध्ये तिसरी आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला असून बीडकरांना रस्ते लाईट पाणी नाली यासारख्या समस्यांना आज ही  तोंड द्यावे लागत आहे बीडच्या जनतेला ही कळून चुकलेली आहे दोन्ही क्षिरसागर यांना निवडून देऊन सुद्धा आपले मुलभुत प्रश्ण मार्गी लागत नाहीत त्याकरिता क्षिरसागर वीरोधी भूमिका घेणारे सर्व पक्ष पदाधिकारी यांनी बीडच्या विकासासाठी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून दोनी क्षिरसागर यांना नगरपालिकेतुन हद्दपार करावे सर्व पक्षांकडे नगरपालिका लढण्याकरिता दोन ते तीन पेक्षाही जास्त उमेदवार आहेत सर्वांनी एकत्र येत नगरपालिकेमध्ये आपले उमेदवार उभे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास निर्धार केल्यास नगर पालीकेवर तीसर्या आघाडीचीच सत्ता येण्यास कुणीही रोकु शकत नाही असा ठाम वीश्वास धम्मानंद वाघमारे यांनी केलाआहे नगरपालिकेवर मागील 35 वर्षापासून ऐक हाती सत्ता असताना देखील अद्यापही बिडकरना मूलभूत सुविधा देण्यास क्षिरसागर कुंठुबीय असक्षम ठरले असल्याचे दिसून आले आहे. 
याच मूलभूत प्रश्नांना हातामध्ये घेत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकी मध्ये तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्धारकेला आहे.  निवडणुकीच्या तोंडावर क्षिरसागर आम्ही काम कितपत योग्य करत आहोत असे दाखवतात मात्र निवडणूक जिंकून आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करून आपली आरामदाई जिंदगी जगण्यात मग्न असतात मात्र सामान्य नागरिक दररोज जनावरांप्रमाणे जीवन जगतो नगरपालिकेमध्ये कुठलेही काम वेळेवर होत नाहीत सामान्य नागरिकांना  अर्ध्या तासच्या कामास दोन ते तीन दिवस ताटकळत उभे राहावे लागते  येणारी पीढी ही व्यसनाधीन बनत असुन  येणाऱ्या पीढीच्या ऊज्वल भवीष्या करीता नागरीक तीसर्या आघाडीस मत देऊन सत्ता हाती देतील असा ठाम वीश्वस आहे. नागरिकांच्या या सर्व गोष्टी लक्षात ठेवत बीडमध्ये तिसरी आघाडी स्थापन करणार असे आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा