Subscribe Us

header ads

आंबेसावळी येथील शेतकऱ्याचे रोडच्या दोन्ही बाजूचे कठाडे न बांधल्याने शेतीचे नुकसान


ढेकनमोहा ते आंबेसावळी रस्ता काम केलेल्या गुत्तेदाराने जाणीवपूर्वक ओढ्याचे पाणी शेतात सोडले

ढेकणमोहा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील आंबेसावळी येथील शेतकरी तात्याराम लक्ष्मण   निसर्गंध यांची आंबेसावळी ते ढेकणमोहा रोडच्या बाजूला  गट नं. 177 शेती आहे. ढेकनमोहा ते आंबेसावळी रस्त्याचे डांबरीकरण काम झाले आहे. रस्त्याच्या बाजूलाच आमची शेती असून, पुलाच्या बाजूला दोन्ही कठाडे न बांधल्यामुळे झालेल्या पावसामुळे आमच्या शेतात पाणी शिरल्याने आमच्या शेतीसहीत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे माझे संपूर्ण शेत वाहून गेले आहे. शेतातील सर्व पिकासह मातीचा पहिला थर देखील या पाणीने वाहून गेला आहे. शेतीला मोठा ओढा पडला आहे. संबंधित गुत्तेदाराला, गावातील लोकप्रतिनिधींना याबाबत वारंवार सांगून देखील कोणीच माझी दखल घेतली नाही. संबंधित रोडचे काम करणाऱ्या गुतेदाराने जाणीवपूर्वक रोडच्या नालाचे पाणी शेतात सोडल्याने शेतीचं मोठे नुकसान झाले आहे. झालेले नुकसान भरून द्यावे अन्यथा दोन्ही बाजूला कठडे बांधून द्यावे नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी आंबेसावळी येथील शेतकरी तात्याराम निसर्गंध यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा