Subscribe Us

header ads

संदिप चव्हाण यांच्या मृत्युची चौकशी व खुनाच्या कटात सहभागी आरोपीस कडक शिक्षा द्यावी ---प्रा.पी.टी. चव्हान


व इतर मागण्यांसाठी बीड जिल्हाधिकारी  कार्यालया समोर उपोषणास सुरुवात

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड प्रतिनिधी/१० गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील इयत्ता ९ वी वर्गात १५ वर्षीय युवक नामे संदिप सोपान चव्हाण हा दि.०७/०५/२१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या भेंडटाकळी शिवारातील शेतात विहीरीवरील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेला होता. सायं वाजेपर्यंत तो घरी आलाच नाही, तांड्यातील रहिवाशीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता चव्हाण याचा मृतदेह भेंडटाकळी गावाचे रहिवाशी विठ्ठल लोंढे यांच्या शेतातील उसाच्या फडात अवस्थेत आढळून आला. मृतदेह दाखविण्याचे काम किशोर विठ्ठल लोंढे या युवकाने केले.संदिप चव्हाण शेतात जातो आणि दोन तासातच त्याचा मृतदेह विठ्ठल लोंढे यांच्या शेतात यावरुन एक गोष्ट सिध्द होते की, संदिप चव्हाण याचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच शेतातील ऊसाच्या फडात लवपून ठेवण्यात आला होता.सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सदरील घटनेला एक महिना झाले तरी पोलीस प्रशासनाने अद्यापपर्यंत आरोपीला अटक केलेली नाही. या घटनेच्या निषेधार्थ समस् समाज गेवराई च्या वतीने १४ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग- २२२ भेंडटाकळी फाटा येथे  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तरी देखील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी या प्रमुख व इतर मागण्यार जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी उपोषण करण्यात आलं होतं या वेळी गोरबंजारा संघर्ष समितीची बीड जिल्हा व नेते  प्रा.पी.टी चव्हाण हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत बी.एम.पवार,शरद चव्हान,जीवन,राठोड, सर्जेराव जाधव,जायकोबा राठोड, सुशांत पवार अंकुश राठोड,एकनाथ आडे,काशीनाथ राठोड, बाजीराव राठोड,पवन जाधव  उपस्थित होते.

या उपोषणाच्या माध्यमातून खालील मागण्या शासनाने मंजुर कराव्यात.

 बंजारा VJA जातीचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करुन बोगस प्रमाण पत्र चौकशी करावी. तसेच बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पडदा फाश करावा.  बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकन्यांना सरसकट नुकसान भरपाई त्वरी द्यावी.
नवी मुंबई येथील विमातळाला माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्  सन २०२० चा पिकविमा शेतकऱ्यांना विनाअट मंजुर करुन देण्यात यावा. तरी  मुख्यमंत्री यांना वरील मागण्याचा गांभीयाने विचार करुन त्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत  गोरबंजारा समिती बीड जिल्ह्याच्या वतीने प्रा.पी.टी. चव्हाण यांनी केली आहे त्यांच्यासोबत अनिल राठोड, अमर राठोड, पवन जाधव, अंकुश राठोड, गोविंद राठोड, रवींद्र बळीराम, राठोड सुंदर, पवार बाबू चव्हाण, गणेश पवार, रोहिदास चव्हाण, छगन चव्हाण, राजू पवार एकनाथ राठोड, काशिनाथ राठोड, जनार्दन चव्हाण, सिताराम चव्हाण, भानुदास जाधव, महादेव चव्हाण, रमेश राठोड, बाळासाहेब चव्हाण, गोरख राठोड, विलास राठोड, विलास चव्हाण, सचिन जाधव, सुरेश चव्हाण, भारत राठोड, रवी पवार, व मोठ्या प्रमाणात बंजारा महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसुन आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा