Subscribe Us

header ads

राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलच्या वतीने नेशन बिल्डर अवाॅर्ड- २०२१ आणि गरजु व हाेतकरु महिलांना शिलाई मशनीचे वितरण

शिक्षक हे शेवटचे नाहीत ते कायम प्रथमस्थानी राहतील
शिक्षणाधिकारी विक्रम सारुक यांचे प्रतिपदान

बीड_भारत देशाला स्वातंत्र्य मिळवूण देण्यासाठी क्रांतीकारक, हुतात्मे जे झालेले  आहेत त्यांच्या प्रमाणेच  अभ्यासकांच्या माहितीनुसार ८० टक्के शिक्षकांचाही त्यात वाटा आहे. स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ते कायम टिकले पाहिजे ही चळवळ जिवंत ठेवण्यामध्ये ९० टक्के शिक्षकांचा समावेश आहे . पुढे वैचारिक आणि अध्यापण काैशल्यावर तयार झालेलेल्या लाेकशाहीला िचरंतन ठेवण्यातही शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेवरील, खासगी संस्थेवरील किंवा अंतरराष्ट्रीय इंग्लीश स्कुलमध्ये काेणत्याही ठिकाणी ज्ञानदानाचे प्रवित्र व प्रामाणिकपणे कार्य करणारे शिक्षक हे शेवटचे नाही तर ते कायम प्रथमस्थानी अाहेत अाणि राहतील, असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक यांनी केले.
राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त मंगळवारी (दि. २१) अादर्श शिक्षक पुरस्कार २०२१ (नेशन बिल्डर अवाॅर्ड-२०२१) अाणि गरजु व हाेतकरु महिलांना शिलाई मशनीचे वितरण कार्यक्रम हाॅटेल अन्वीता सभागृह येथे घेण्यात अाला. यावेळी प्रमुख पाहुुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक, बीड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी तुकाराम जाधव यांची उपस्थिती हाेती. व्यासपिठावर क्लबचे अध्यक्ष अजय घाेडके, सचिव महेश जाेशी, चार्टड प्रेसीडेंट संदेश लाेळगे, प्राेजेक्ट चेअरमन कचरु चांभारे, गणेश वाघ, अतुल जाजु, राजीव संचेती, रवी उबाळे उपस्थित हाेते.
शिक्षणाधिकारी सारुक म्हणाले, शिक्षक हे अनादी काळापासून अाहेत अाणि अनंत काळापार्यंत राहतील. कारण जे जे माेठे शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशाेधक किंवा प्रत्येकाच्या विचारानुसार माेठे झालेले अाहे, त्या सर्वांना शिक्षकांनी शिकवलेले अाहे हे प्रत्येकास मान्य करावे लागणार अाहे. समाज व्यवस्थेमध्ये शिक्षक हे अत्यंत महत्वाचे स्थानी अाहे. शिक्षकांना मानानारा माेठा वर्ग समाजव्यवस्थेमध्ये अाहे. शिक्षकांचा प्रभाव समाजावर लाैकीकतेप्रमाणे असताे म्हणून राजकिय नेतेमंडळी देखील शिक्षकांना नेहमीच विचारत घेतात. त्यांच्यावरही मताची बाजू भक्कमपणे राहू शकते, अशी अाेळख देखील शिक्षकांची अाहे. नदी प्रवाहीत असतानाला काेणालाही पाणी देण्यास विराेध करत नाही, वातावरणामध्ये हावा देखील सर्वांना समान अाहे, सुर्यांचा प्रकाश हे देखील समान अाहे, त्याच प्रमाणे कुठेही ज्ञानदानाचे प्रवित्र व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांनी भेद-भावाचे अंतर निर्माण हाेणार नाही याची जानीव ठेवावी, स्वत:ला शेवटचा कधीच न समजता प्रथमस्थानी अाहाेत, हे सत्य समजून घेणे गरजेचे अाहे, असेही स्पष्ट मत शिक्षणाधिकारी सारुक यांनी व्यक्त केले.  गट शिक्षणाधिकारी जाधव यांनी उपक्रमाला शुभेच्छा देत शिक्षकांना अाणखी सकारात्मक व प्रामाणीक कार्य करण्याचे अावाहन केले. यावेळी प्राचार्य सिमा खैरनार, भास्कर ढवळे या दाेन शिक्षकांनी सर्वांच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल मनाेगत व्यक्त केले. यावेळी प्रमाेद करमाळकर, अभिनंद कांकरीया, केदार जाजु, विश्वास शेंडगे, सुकेश राव, उमेश संचेती, चंद्रकांत काळे यांच्यासह राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलचे सर्व सदस्य अाणि त्यांच्या पत्नी, पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचे कुटूंबीय उपस्थित हाेते. या प्राेजेक्टसाठी शुभम ज्वेलर्स, अंकुर नैसर्गिक गुळ उद्याेग समुह, हाॅटेल अन्वीता, माय मायईलस्टाेन अॅकॅडमी, गजाजन अॅग्राे सिड‌्स, सुरज गॅस एजन्सी, वैभव ट्रेडींग कंपनी, यशवंत विद्यालय यांनी अर्थसहाय्यक केले.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्ञानेश्वर तांबे यांनी केले, प्रास्ताविक प्राेजेक्ट चेअरमन कचरु चांभारे यांनी केले. क्लबचे अध्यक्ष अजय घाेडके यांनी नेशन बिल्डर अवाॅर्ड -२०२१ ची भूमीका व्यक्त केली. कार्यक्रमाचे अाभार सचिव महेश जाेशी यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. 
-------
या शिक्षकांचा गाैरव करण्यात आला 
प्रियंका किसनराव पाटील, सारिका अाश्रुबा जगताप, सिमा भारत खैरनार, शारदा सुंदरराव अांधळे, कल्पना अरुण अंबुरे, भास्कर बाबुराव ढवळे, रमेश ज्ञानाेबा गाढे, बन्सी अाश्रुबा हावळे, किसन बाळाराम सावंत, श्रीकृष्ण शंकरराव जाेशी, प्रमाेद मच्छिंद्र वनजारे या शिक्षकांना अादर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात अाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा