Subscribe Us

header ads

सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी द्या- मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे निवेदन


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷


बीड- परभणी जिल्हा,सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांड्यावरील बंजारा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची मानुसकिला काळिमा फासणारी घटना नुकतीच घडली आहे. बलात्कारानंतर उपचारा दरम्यान त्या पिडीत मुलीचा मृत्यू झाला आहे. सदरील प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील यांना बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रीय बंजारा परिषदेने खालील मागण्या कडे मा.न्यायालय आणि सरकारचे लक्ष वेधले आहे.सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडयावरील बंजारा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित  अटक करून मा.न्यायालयाने सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी,खटला जलदगती न्यायालयात चालविण्या साठी सरकारने पुढाकार ठोस पावले उचलावीत,पिडीतेला न्याय द्यावा,सदरील प्रकरणात सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र शासनाने अँड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, बलात्कारित पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण देऊन त्यांना शासनाकडून पन्नास लाखांची अर्थिक मदत करण्यात यावी,या व इतर महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय बंजारा परिषद बीड जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक २२.९.२०२१ रोजी बीड जिल्हाधिकारी  यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव राठोड, कोरोणा योद्धा तथा बंजारा समाजाचे युवा नेते सुरेश पवार,संघटक अमर राठोड,रोहीदास राठोड, ज्ञानेशवर राठोड,राजू राठोड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा