Subscribe Us

header ads

माजलगाव धरणाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे-अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरणार; .मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना बीड जिल्हाधिकारी मार्फत निवेदन

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड- हरित क्रांतीचे जनक, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कृषीतज्ञ, रोजगार हमी,कापूस-ज्वारी एकाधिकार योजना लागू करणारे, चार कृषी विद्यापीठ तसेच उजनी-सोलापूर,अरुणावती- यवतमाळ,अप्पर वर्धा प्रकल्प,जायकवाडी-औरंगाबाद, माजलगाव-बीड या पाच महाकाय प्रकल्पाचे निर्माते,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रणेते व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सर्वाधिक काळ विराजमान राहिलेले माजी मुख्यमंत्री माहानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव माजलगाव धरणाला सन्मानपूर्वक देऊन नाईक साहेबांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. पी.टी.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, जलसंपदा मंत्री ना.जयंतजी पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.बीडचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि २०.९.२१ रोजी मागणीचे निवेदन देण्यात आले.
वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी अनेक महत्वकांक्षी योजना राबविल्या.शेतकरी,शेतमजूर,शोषित, वंचित,निराधारांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शेकडो धाडसी निर्णय घेतले.सलग तीन वेळा विनाखंड मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक नवीन रेकॉर्ड कायम केला.मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन सन्मानित केले.माझा शेतकरी कारखानदार झाला पाहिजे,अशी भूमिका घेत विदेशातून हायब्रीड बियाणे आणून शेतकऱ्यांचा जीवनात अर्थिक क्रांती घडवून आणली.शेतकरी सुखी झाला.राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी नाईक साहेब अजिवन झटले.महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया नाईक साहेबांनीच रचला.अशा महान कृषीवेढया व विशाल राजकीय उंची असलेल्या नेत्यांचे नाव बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाला देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा यथोचित सन्मान करावा,अशी मागणी राज्यातील बंजारा,भटके विमुक्त,बहुजन समाजाच्या वतीने राष्ट्रीय बंजारा परिषदेने केली आहे.
आभाळा एवढे कर्तृत्व असलेल्या महानायक वसंतराव नाईक यांच्या नावाला जाणूनबुजून कोणी विरोध करणार असेल,त्यांना जातीपातीच्या भिंतीत कैद करण्याचा प्रयत्न केले गेले,तर महाराष्ट्रातील बंजारा समाज रस्त्यावर उतरून टोकाचा संघर्ष करेल,असा गर्भित इशारा राज्य सरकारला निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.निवेदनावर प्रा.पी.टी.चव्हाण, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव राठोड,कोरोणा योद्धा सुरेश पवार, जिल्हा संघटक अमर राठोड,श्रीराम पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा