Subscribe Us

header ads

केज मध्ये भीषण अपघात दुचाकीला धडक दोन जागीच ठार एक जखमी


केज_  शहराच्या मध्य भागातील कानडी रस्त्यालगत मध्यरात्री 1: च्या दरम्यान झालेल्या अपघातात  अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक जागीच ठार तर  एक प्रशिक्षणार्थी पोलीस  जवान जखमी झाला आहे. सुजित राऊत, सुमित सिरसाट अशी मृतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की दि: 22  सप्टेंबर रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान सुजित सुरेश राऊत (वय 20) वर्ष सुमित संदिपान सिरसाट (वय 18)  वर्ष दोघे रा.  फुले नगर केज व गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण
घेत असलेले विजय कुमार पांडुरंग घोळवे रा.  समता नगर केज हे मोटार सायकल वर  (एमएच- 44/ एम -2303)  घराकडे जात होते. शहराच्या मध्यभागातून जात असलेल्या केज बीड महामार्गावर कानडी रोड वरील कांचन मेडिकल समोर एका अज्ञात वाहनाने मागील बाजूने धडक दिली. यात सुजित ची मोटार सायकल सुमारे 100 ते 150 फूट फरफटत नेली तर विजयकुमार पांडुरंग घोळवे  यांच्या उजव्या पायाला
व डोक्याला मार लागला हा अपघात एवढा गंभीर होता की रस्त्यावर रक्त मासा चा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे,  पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धी,  रमेश सानप,  बाळासाहेब अहंकारे  व चालक हनुमंत गायकवाड हे  घटनास्थळी हजर झाले होते.  त्यांनी मृतदेह व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा