Subscribe Us

header ads

बीड दगडी पुलावरून पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

बीड_दगडी पुलावरून पाय घसरून पडल्यामुळे बिंदुसरा नदी मध्ये वाहून गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार वाजता घडली
शेख मुस्ताक शेख जावेद वय 18 वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे. दाऊदपुरा भागात रहात असलेला हा तरुण दगडी पुलावरून जात असताना अचानक पाय घसरून बिंदुसरा नदी पात्रात पडला. सध्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे मोंढा रोड पूलाखाली त्याचा मृतदेह काही जणांना आढळून आला या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत युवकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा