Subscribe Us

header ads

सेवानिवृत्तांच्या समस्येवर से.ब.अ-क.महासंघाची जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी पेंशन अदालत मध्ये चर्चा संपन्न

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड (प्रतिनिधी) दि. - 6 रोजी सेवा निवृत्त बहुजन अधिकारी  महासंघाचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन आठवले व सचिव जी. एम. भोले यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या अडीअडचणी व समस्येवर चर्चा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे दिनांक व वेळ मागितला होता. त्याचे उत्तर म्हणून दिनांक - 21 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे वेळ व दिनांक दिला गेला आणि आज दिनांक 22/9/21 रोजी पेंशन अदालत घेण्यात आली. सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव जी. एम. भोले व अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले तसेच पांडुरंग गोरकर सर व शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित राहिले. प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व नंतर पेंशन अदालत बैठकीला सुरुवात झाली. प्रसंगी सेवानिवृत्तांच्या शारिरीक समस्या - बीपी, शुगर, डायबिटीज यावर खुप मोठा वेतनाचा हिस्सा वापरला जातो व निवृत्ती वेतनास विलंब झाल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणुन बैठकीत पेन्शनरचे वेतन महिण्याच्या 2 तारखेपर्यंत करु. चर्चा मध्ये सर्व समस्येवर सकारात्मक भूमिका घेऊन सर्व समस्या सोडविण्याचे  महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) यांनी असे आश्वासन दिले. सर्व समस्या लेखी स्वरूपात दिल्या गेल्या आणि प्रत्येक बैठकीस सेवानिवृत्त बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ बीड यांना पाचारण केले जाईल असे सांगितले. पांडुरंग गोरकर सर यांचे शिष्टमंडळ, सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव जी. एम. भोले सर, संघटक- शिवाजीराव पंडित, कोषाध्यक्ष - बळीराम दळवी,  ता.सचिव - दादाराव गायकवाड, लिंबाजी जाधव सर (बीड), ता. अध्यक्ष डी.एम. राऊत (वडवणी), रविंद्र पंडित सर, व इतर उपस्थित राहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा