Subscribe Us

header ads

इन्स्पायर करिअर अकॅडमीने सर्वसामान्य विद्यार्थी घडवावेत- अँड. अजित देशमुख

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड ( प्रतिनिधी ) इन्स्पायर करिअर अकॅडमी, बीडच्या माध्यमातून एन.एम.एम.एस परीक्षेमध्ये अकॅडमीतुन बावीस पैकी सतरा विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले. त्यामुळे अँड. अजित देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. खुराना काळामध्ये लफडं सारखे परिस्थितीतून मार्ग काढून अश्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ला पात्र ठरून सोपं नव्हतं मात्र अकॅडमीमध्ये काम करत असलेल्या शिक्षक वृंद स्वतःच्या इच्छेने काम करत असल्यामुळे हे शक्य झालं भविष्यात देखील या अकॅडमी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त ऍड अजित देशमुख यांनी व्यक्त केले मांडले याच वेळी अकॅडमी तर्फे कोविड काळात केल्यामुळे वर्ल्ड  बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन  हा पुरस्कार मिळालेले अँड. देशमुख यांच्या सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जवळपास सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. आता या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पास होई पर्यंत दर महिन्याला एक हजार रुपये प्रमाणे प्रति वर्षी बारा हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यार्थ्यांकडून आपण किती फिस घेतो. यापेक्षा आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कसे शिकवता येईल याकडे इथला स्टाफ नेहमीच लक्ष देतो. विद्यार्थी घडविण्यासाठी इन्स्पायर करिअर अकॅडमी सातत्याने अग्रेसर राहते. येथील शिक्षक व्रदं देखील मनातून काम करत असल्याने अकॅडमी चा आलेख वाढत चाललेला आहे. त्यामुळे या सर्वांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना अँड. देशमुख यांनी भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवार सर होते. कार्यक्रमाचे आयोजन अकादमीचे प्रमुख राजकुमार वाघमारे सर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच अकॅडमी बद्दलचे आपले अनुभव सांगितले. त्याच प्रमाणे अनेक पालकांनी देखील आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमास गोवर्धन मस्के,  गवते, लाड, पवार, काळे इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होतात. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुधीर तेलप यांनी केले. कार्यक्रमास ग्रामीण भागातून आलेला पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा