Subscribe Us

header ads

पौर्णिमे निमित्त धम्मदेसना, सत्कार व भोजनदान चे आयोजन

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

बीड (प्रतिनिधी) तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संम्यक विचारी धम्म मार्गाचा स्वीकार करून धम्मकार्याचे कार्य प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड च्या वतीने सातत्यपूर्वक होत आहे. भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना, सत्कार समारंभ व भोजनदानाचे आयोजन पर कार्यक्रमाचे आयोजन दि. 20/09/ 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी  ता. जि. बीड येथे करण्यात आले आहे.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक घटना पोर्णिमेला साक्षी ठेवून घडल्या आहेत. ही भाद्रपद पौर्णिमा वर्षावासातील तिसरी पौर्णिमा आहे. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, म्हणजे या तीन महिन्याच्या वर्षा ऋतूतील कालावधीत बौद्ध भिक्खूंनी धम्म अनुयायांना अविरतपणे धम्म सांगितलेला असतो. तथागत भगवान गौतम बुद्धांनीही या महिन्यात राजा बिंबिसार यांना धम्मदीक्षा देऊन त्यांना उपासक बनविलेले आहे. तथागताचा धम्म जसा भिक्खुंसाठी होता तसाच तो धम्म उपासक-उपासिका, ग्रहस्थ, ब्रह्मचार्य, लहान-मोठे, बालक- बालिका, राजे-महाराजे यांच्यासाठीही एक समान होता. याच पौर्णिमेला कोशल नरेश राजा प्रसेनजीत एकदा धम्मदेसना ऐकण्यासाठी जेतवन येथे आले असता भगवंतांनी त्यांना जो उपदेश केला, तो सर्वांसाठी श्रवणीय आहे. या तथागतांच्या उपदेशाला समजून घेऊन तो आचरणात यावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी पु. भदंत करूणानंद थेरो  (जिल्हाध्यक्ष,भिक्खू संघ-औरंगाबाद.), हे धम्मदेसना देणार आहेत तर उपासक आयु. एच. एस. उजगरे साहेब, औरंगाबाद (माजी सहाय्यक, दुय्यम निबंधक,बीड.) यांचा संस्थेच्या वतीने आदर सत्कार केला जाणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी-  मा.बाबासाहेब दिगंबर घुमरे (ग्रामसेवक-शिवणी), मा. सुधाकर अंबादास शिंदे (सरपंच- शिवणी), मा. बालासाहेब वैजनाथ कुटे (उपसरपंच- शिवणी), मा. रामराव आनंदराव सुपेकर ( शिवणी) आदींसह उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम संपन्न होताच उपासक आयु.दामोदर डोळस यांच्या वतीने उपस्थित  उपासक-उपासिका व सर्वांना भोजनदान दिले जाणार आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भिक्खू धम्मशील व प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था,बीड चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व धम्म उपासक-उपासिका व धम्म अनुयायी यांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून या कार्यक्रमाकरिता वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा