Subscribe Us

header ads

आयपीएल 2021 चा पहिला मुकाबला मुंबई इंडिन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे.भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होईल. मुंबई चौथ्या क्रमांकावर आयपीएल 2021 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. टीमने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीची टीम 8 पैकी 6 मॅच जिंकत 12 पॉईंट्ससह टॉपवर आहे.चेन्नई 10 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि बँगलोरही 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी याच मोसमात चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला.पोलार्डने  34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो. मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली.तर 2019 साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे 11 खेळाडू जवळपास निश्चित आहेत, फक्त एका जागेवरून तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते. आठव्या क्रमांकावर मुंबईकडे जेम्स नीशम, नॅथन कुल्टर नाईल आणि एडम मिल्ने हे तीन फास्ट बॉलर्सचे पर्याय आहेत जे बॅटिंगही करू शकतात. एडम मिल्ने याने नुकत्याच झालेल्या द हंड्रेड स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

मुंबईची संभाव्य टीम

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जेम्स नीशम/नॅथन कुल्टर-नाइल/ एडम मिल्ने, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

चेन्नईची संभाव्य टीम

ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जॉस हेजलवूड/लुंगी एनगिडी, इम्रान ताहीर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा