Subscribe Us

header ads

भारत निवडणूक आयोगाचा मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्हयात सुरु - जिल्हाधिकारी


बीड,दि.18(जि.मा.का.) भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. दिनांक 01 नोव्हेंबर  2021 रोजी प्रारूप मतदार यादी व दि. 05 जानेवारी 2022रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी.राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.या कार्यक्रमामध्ये दि. 01 नोव्हेंबर  2021 ते 30 नोव्हेंबर  2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील .यामध्ये 01 जानेवारी 2022 रोजी ज्यांचे वय 18 वर्ष पुर्ण होत आहे अशा नवमतदारांनी तसंच ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा यर्व मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नाव नोंदणी करावी .मतदार यादीमध्ये  नाव  समाविष्ट करण्यासाठी नमुना  क्र.6 भरावा व मतदार यादीतुन नाव वगळण्यासाठी नमुना  क्र.7 भरावा तसेच मतदार यादीमधील तपशिलामध्ये काही दुरूस्ती करावयाची असल्यास नमुना  क्र.8भरावा आणि ज्या मतदारास त्यांचे नाव त्याच मतदार संघात दुसऱ्या भाग क्रमांकात समाविष्ट करावयाचे आहे त्यांनी नमुना  क्र.8 अ भरावा मतदार यादीमध्ये  नाव  समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा भारत निवडणूक आयोगाने ,आयोगाचे संकेतस्थळावर तसेच Voter Helpline या मोबाईल ॲप द्वारे उपलब्ध करुन दिलेली आहे. आपले आवश्यक्तेनुसार भरण्यात आलेला नमुना क्रं 6,7,8,8अ योग्य व आवश्यक त्या पुराव्यासह संपुर्ण तपशिल भरुन ऑनलाईन सादर करावा .अथवा संबधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) अथवा संबंधित तहसिल कार्यालय येथे सादर करावा असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी  प्रविण धरमकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा