Subscribe Us

header ads

शिवाजी महाराज पुतळा ते चर्‍हाटा फाटा पर्यंत रस्त्यावरील खड्डे भरून साईट पंख्यांना मुरूम टाकून भरा - शेख मोहसीन

बीड (प्रतिनिधी) - शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते चर्‍हाटा फाटा पर्यंत बीड-अहेमदनगर रस्त्यावरील खड्डे भरून साईट पंख्यांना मुरूम टाकून भरावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे कि, शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते चर्‍हाटा फाटा पर्यंत अहेमदनगर रोडची पार चाळणी झाली आहे. फुटा-फुटावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह पादचार्‍यांना ही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने जोरात आदळत असून वाहनचालकांना मानेचे व कमरेचे मणक्यांचा त्रास होत आहे. तर अनेक दुचाकी चालक पडून जखमी सुद्धा होत आहेत. जनतेचे हे हाल थांबविण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता या नात्याने आपण युद्धपातळीवर या रस्त्यावरील सर्व खड्डे लवकरात लवकर बुजवून द्यावे. तसेच याच रस्त्याच्या दोन्ही कडेचे साईट पंखे सुद्धा मुख्य रस्त्यापेक्षा एक ते दीड फूट खोल गेल्याने रस्त्यावरून खाली जाणारे तसेच खालून रस्त्यावर येणार्‍या वाहन चालकांना जीवाची जोखीम घेत वाहन चालवावे लागत आहे. ही कसरत करताना अनेक दुचाकीस्वार पडत असून  दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता या रस्त्यावरील साईट पंखे ही मुरूम टाकून लवकरात लवकर भरून घेण्यात यावे. कार्यकारी अभियंता साहेब आजमितीला जरी हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये संलग्नित करण्यात आला असला तरी रस्त्याचे हाल त्यापूर्वीचे असून याकडे आपण व आपल्या विभागाने लक्ष देऊन काम न केल्याने आज ही अवस्था झालेली आहे. तरी याकडे लक्ष देऊन त्वरित या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून साइट पंखे मुरूम टाकून रोड लेव्हल करून घेण्यात यावे. अशी मागणी करून जर लवकरात लवकर हे कार्य करण्यात आले नाही तर आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन बुर्‍हानोद्दीन यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता, जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा