प्रतिनिधी नवनाथ गोरे मो. 9823310880
वाकनाथपूर-:वाकनाथपुर येथे नाली सफाईचे काम कित्येक वर्षा पासुन झाले नाही.ग्रामसेवक यांना सांगुन देखील नाली सफाईचे काम होत नाही नाली साफ नसल्याने नाली मध्ये घाण पाणी जमा होत आहे. काही नालीचे पाणी रोड वरून वाहत आहे.नाली च्या घाण पाण्याने परिसरात खुप मच्छर झाले आहे. मच्छर चावल्याने परिसरात अनेक रोग पसरत आहेत.
तरी ग्रामसेवक यांनी नाली साफ नसेल करायची तर गावामध्ये मच्छर मारण्यासाठी फवारणी तरी करावी. नसता परिसरातील नागरीकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागेल.ग्रामसेवक गावात काय चालु आहे हे पाहण्यासाठी एक एक महिना गावाकडे येत नाहीत. ग्रामसेवक हे घरी बसून पगार उचलण्यासाठी नोकरी करतात का? गावात पिण्याचे पाणी दुषित आहे पिण्यासाठी पाणी नाही सहा महिन्यापूर्वी पाणी फिल्टर हे गावची शोभा वाढवण्यासाठी बसवले आहे का?
ग्रामसेवक यांनी गावात येऊन एक ग्लास पाणी प्यावे. तर त्यांना कळेल पाणी किती दूषित आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वाऱ्यावर सोडून घरी बसुन बाटली च पाणी पिऊन फक्त पगार उचलतात तरी ग्रामसेवक हे विकास का करत नाहीत याची चौकशी वरीष्ठ अधिकारी यानी लवकरात लवकर करावी अशी मागणी या गावाचे लोक करीत आहे.
0 टिप्पण्या