Subscribe Us

header ads

घोडका राजुरी व जरूड च्या दोन्ही पुलाची दुरावस्था पुलाची दुरुस्ती १५ दिवसात न केल्यास माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचा आंदोलनांचा इशारा

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड प्रतिनिधी/ दि‌.२३ बीड शहरा पासुन जवळच असलेल्या घोडका राजुरी व जरूड या ठिकाणी बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या दोन फुले  म्हणजेच राज्य रस्त्याच्या वर  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महत्त्वपूर्ण पुलाचे रुंदीकरण व दुरुस्ती तात्काळ करणे आवश्यक आहे या दोन्ही पुलाचे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. सुरक्षा कठाडे यांची मोडतोड झाली आहे व अनावश्यक मोठी धनदाट झाडे  मोठी झाली आहेत व तोडणे  आवश्यक आहे.तेलगांव, वडवणी, परळी,  धारूर, गंगाखेड, परभणी, नांदेड,  कडे  जाणाऱ्या मुख्य मार्गावर हे दोन्ही पूल येतात याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे.विशेषतः या रस्त्या वरून जिल्ह्याच्या खासदार प्रितमताई मुंडे, सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे ये जा करत असताना त्यांनी जाणीव पूर्वक या पुलांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी सैनिक वाघमारे यांनी केला आहे.
 या दोन्ही पुलाच्या आसपास संरक्षण कठाडे व संरक्षण  कवच अथवा भिंत अथवा फलक व त्यावर वाढलेल्या  दोन्ही बाजुच्या वृक्षांची तोडनी करणे  आवश्यक आहे. यामुळे या दरम्यान येणाऱ्या अनेक वाहन धारकांची होणारी गैर-सौय दूर होईल, या ठिकाणी सूचनाफलक किंवा दिशा दर्शक फलक आवश्यक आहेत व दोन्ही ठिकाणी पुलाचे रुंदीकरण व दोन्ही बाजुचे लोखंडी कठडे तातडीने तयार करणे आवश्यक आहे अशी मागणी सेवानिवृत्त माजी सैनिक तथा समाजसेवक प्रकाश वाघमारे यांनी प्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी भेट देऊन केली आहे.  ही दोन्ही कामे तात्काळ १५ दिवसात  होणे अपेक्षित आहे, जर झाली नाही तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.या विषयाची तात्काळ गंभीर दखल घेऊन सर्वसामान्य जनतेला प्रवाशांना अपघाताला निमंत्रण घालणार्रा पुलाची दुरुस्ती करावी, होणाऱ्या अडचणी दूर करणे आवश्यक आहे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत जेणेकरून भविष्यात या ठिकाणी अपघात होणार नाहीत व पुढे अशा प्रकारचे धोकादायक पूल आहेत याचे फलक लावणे हे गरजेचे आहे अशी मागणी प्रकाश वाघमारे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा