Subscribe Us

header ads

बीड येथील ओबीसी व्हिजेएनटीं आरक्षण निर्धार मेळाव्याला बंजारा बांधवांनी उपस्थित राहावे--- प्रा.पी.टी. चव्हाण

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड- रविवार दि. २६.९.२०२१ रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने भव्य ओबीसी व्हिजेएनटीं आरक्षण बचाव निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन ओबीसींचे नेते मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असून मुख्य मार्गदर्शक म्हणून ओबीसी कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला बीड जिल्हा सह महाराष्ट्रातील बंजारा भटके विमुक्त बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांनी केले आहे.सदरील मेळाव्यात ओबीसी व्हिजेएनटीं बारा बलुतेदार समाजाच्या सामाजिक शैक्षणिक अर्थिक राजकीय व स्थगित करण्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या मेळाव्याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे,माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, खा.प्रितम मुंडे,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, बंजारा समाजाचे नेते तथा आमदार राजेश  राठोड,रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आ. महादेव जानकर,आ संदिप भैय्या क्षिरसागर,शब्बीर अन्सारी इत्यादी नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले असून मेळावा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेतील प्रमुख नेत्यांची अनेक समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत.तरी सदरील मेळाव्याला बंजारा समाज,भटके विमुक्त बहुजन समाजातल्या विविध संघटनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समस्त ओबीसी समाजाची परिवर्तनवादी चळवळ गतिमान करावी असे आवाहन जेष्ठ नेत्या प्रा.सुशिलाताई मोराळे, प्रा.पी.टी.चव्हाण,बी.एम.पवार,अँड.सुभाष राऊत,जे.डी.शहा,सुरेश पवार, बाजीराव राठोड,सुंदरसिंग महाराज राठोड,अंकुश निर्मळ, सुशांत पवार, रमेश पवार, कृष्णा राठोड,संजय चव्हाण,जायकोबा राठोड, विनायक चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, सतिश पवार,पवन जाधव, भुषण पवार, एकनाथ आडे,अमर राठोड, गोरक्षनाथ पवार, अंकुश राठोड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा