Subscribe Us

header ads

मन शुद्ध ठेवून केलेले कार्य महान असते--- पु.भदंत करूणानंद थेरो

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड (प्रतिनिधी) तथाग भगवान गौतम बुद्धांनी दिलेला मानवतेचा, करुणेचा व शिल  संपन्नतेचा मार्ग स्वीकारून राष्ट्राच्या उभारणीसाठी अनेक महापुरुषांनी आपल्या हातून महान कार्य केले आहेत. त्यातच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हणजे राष्ट्राच्या बदलाच्या नव्या रूपाचे महान असे कार्य ठरले. ममतेचा व समतेचा विचार हाती घेऊन न्यायिक मार्गाने सर्वांच्या उत्थानाचे समृद्ध कार्य केले. मोठ्या मनाने व मन शुद्ध ठेवून केलेले कार्य केव्हाही महान असते, असे मत पु. भदंत करूणानंद थेरो यांनी व्यक्त केले.भाद्रपद पौर्णिमेनिमित्त भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी  ता. जि. बीड येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी धम्मदेसना देताना ते आपले मत व्यक्त करत होते. यावेळी प्रमुख अतिथी-  बाबासाहेब दिगंबर घुमरे (ग्रामसेवक-शिवणी),  सुधाकर अंबादास शिंदे (सरपंच- शिवणी), बालासाहेब वैजनाथ कुटे (उपसरपंच- शिवणी), रामराव आनंदराव सुपेकर ( शिवणी) आदींसह उपस्थित होते.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक घटना पोर्णिमेला साक्षी ठेवून घडल्या आहेत. ही भाद्रपद पौर्णिमा वर्षावासातील तिसरी पौर्णिमा होती. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, म्हणजे या तीन महिन्याच्या वर्षा ऋतूतील कालावधीत बौद्ध भिक्खूंनी धम्म अनुयायांना अविरतपणे धम्म सांगितलेला असतो. तथागत भगवान गौतम बुद्धांनीही या महिन्यात राजा बिंबिसार यांना धम्मदीक्षा देऊन त्यांना उपासक बनविलेले आहे. तथागताचा धम्म जसा भिक्खुंसाठी होता तसाच तो धम्म उपासक-उपासिका, ग्रहस्थ, ब्रह्मचार्य, लहान-मोठे, बालक- बालिका, राजे-महाराजे यांच्यासाठीही एक समान होता. याच पौर्णिमेला कोशल नरेश राजा प्रसेनजीत एकदा धम्मदेसना ऐकण्यासाठी जेतवन येथे आले असता भगवंतांनी त्यांना जो उपदेश केला, तो सर्वांसाठी श्रवणीय आहे. या तथागतांच्या उपदेशाला समजून घेऊन तो आचरणात यावा याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपासक एच. एस. उजगरे साहेब, औरंगाबाद (माजी सहाय्यक, दुय्यम निबंधक,बीड.) यांचा संस्थेच्या वतीने आदर सत्कार करण्यात आला.  कार्यक्रम संपन्न होताच उपासक दामोदर डोळस यांच्या वतीने उपस्थित  उपासक-उपासिका व सर्वांना भोजनदान देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संयोजक पु.भिक्खू धम्मशील व प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था,बीड चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक प्रा. राम गायकवाड यांनी केले, प्रास्ताविक . गुलाबराव भोले यांनी  केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी व्यक्त केले. यावेळी उपासक-उपासिका व धम्म अनुयायी यांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून या कार्यक्रमाकरिता वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा