Subscribe Us

header ads

बीड शहरातील खड्डे गणना आंदोलन आम आदमी पार्टी करणार--- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड-: बीड शहरातील बार्शी रोड जालना रोड नगर रोड या शहरांमधून जाणारे रस्त्याची बऱ्याच दिवसापासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही या रस्त्यामध्ये शासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे शहरातील नागरिकांना खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे या खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचे आजार कमरेचा आजार मेंदूचे आजार वाहन चालवताना होणारे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे खड्डे चुकविण्याच्या नादात होणारे अपघात यामध्ये खूप मोठ्या प्रमाण वाढले आहे यामुळे शहरातील नागरिकांची आर्थिक शारीरिक व मानसिक कधीही  न भरून निघणारे नुकसान होत आहे आणि फक्त सत्ताधाऱ्यांच्या जन प्रतिनिधींच्या आपापसातल्या वाटाघाटी मुळे वैयक्तिक घरगुती वादामुळे शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम येथील जनप्रतिनिधी व प्रशासन करत आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे जातीने लक्ष द्यावे आज आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे कळविण्यात आले. की आम आदमी पार्टी गुरुवार सकाळी ठिक 10.30वा. दिनांक 16 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस पेट्रोल पंप या रोड वरती खड्डे गणना आंदोलन करण्यात येणार आहे. जनतेचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होत आहे या बोला ना मध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आव्हान आम आदमी पार्टी करत आहे. आंदोलनाला प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम-आदमी-पार्टी मोठे जनआंदोलन उभा करीन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा