Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरात नऊ उपकेंद्रांना लवकरच मंजुरी 25 हजार लोकसंख्येमागे 1 उपकेंद्राचा नागरिकांना फायदा होणार

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):-बीड शहराची लोकसंख्या विचारात घेता केवळ दोनच आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. शाहुनगर आणि पेठ बीड भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामास मंजुरी मिळवून निधी आलेला आहे. आता त्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच दोन आरोग्य केंद्र अंतर्गत 25 हजार लोकसंख्येस एक (आरोग्यवर्धनी) नवीन उपकेंद्रास आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून लवकरच मंजुरी मिळेल. एनएचएम बीड विभागामार्फत प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला असून या उपकेंद्राचा शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे. बीड शहरात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून विकास निधी व विविध प्रश्न मार्गी लावले जात आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पेठ बीड आणि मोमीनपुरा या भागातील मंजुर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (आरोग्यवर्धीनी) उपकेंद्राचे प्रस्ताव सादर करण्यात यावे अशा सूचना एनएचएम विभाग व आरोग्य विभागाला दिल्या होत्या. पंचवीस हजार लोकसंख्येमागे एक उपकेंद्र या प्रमाणे प्रस्ताव तयार करून तात्काळ मंजुरीसाठी पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्यानंतर बीड शहरातील एमआयडीसी, सावतामाळी चौक, अंबिका चौक, बालेपीर, राजु नगर, धानोरा रोड, धांडे नगर, बार्शी रोड, गांधी नगर, पालवण चौक, खासबाग अशा नऊ ठिकाणी उपकेंद्राचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून आयुक्तस्तरावर ते सादर करण्यात येत आहेत. या नऊ उपकेंद्राच्या उभारणीमुळे जेणेकरून बीड शहरातील नागरिकांना आरोग्य विषयक दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा