Subscribe Us

header ads

आपले आशिर्वाद सोबत राहू द्या,25 वर्षात मोमीनपुर्‍याचा जो विकास झाला नाही तो विकास करेल-आ.संदिप क्षीरसागर; मोमीनपुरा भागात सव्वा कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- मोमीनपुरा म्हणजे माझी राजुरीच, मोमीनपुर्‍याचा झटका सगळ्यांनाच माहिती. याभागाने मागच्या पालिकेत झटका दिला पण आमदारकीला भरभरून दुवाँ दिली. विधानसभेच्या निवडणूकीत मोमीनपुर्‍याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोणत्याही विकास कामात मोमीनपुरा पहिल्यांदा आठवतो. कोरोनामुळे मोठ्या अडचणी आल्या. परंतू येत्या काळात आपल्या आशिर्वादाच्या बळावर गेल्या 25 वर्षाच्या काळात मोमीनपुरा भागाचा जो विकास झाला नाही तो विकास मी करेल. सुभाष रोडच्या धर्तीवर या भागातले रस्ते करेल येणार्‍या निवडणूकीत समोर कोणीच दिसत नाही, आपल्या भूमिका स्पष्ट आणि सेक्युलर विचाराची आहे. विरोधकांची भूमिका नेहमी बदलते, आपण जो शब्द दिला तो पुर्ण करणारच, विकास कामात कमी पडणार नाही. आपण आपल्या आशिर्वादाच्या बळावर या भागातील सर्व नगरसेवक निवडुण द्या, पुर्ण पालिका ताब्यात आल्यानंतर विकास कामे करण्यासाठी आणखी गती मिळेल असे प्रतिपादन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले. ते मोमीनपुरा भागातील सव्वा कोटी रूपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
बीड शहरातील मोमीनपुरा भागातील प्रभाग क्र.20 व 21 मध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सव्वा कोटी रूपयांच्या विविध रस्ते व नाली विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, जावेद भाई कुरेशी, शाहेद पटेल, लक्ष्मण ईटकर, सचिन जाधव, खुर्शीद आलम, मसी भाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, या भागातील रस्ते, नाल्यांच्या प्रश्नाबरोबरच बिंदूसरेचा पुलाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल. येत्या काही दिवसात या बंधाराकम पुलाचे काम सुरू होईल. उर्दु शाळेसाठीही 68 लाख रूपयाचा निधी दिला आहे. गेल्या 25 वर्षाच्या काळात जो विकास या भागाचा झाला नाही तो विकास करेल. आपल्या आशिर्वादाच्या बळावर पुर्ण पालिका ताब्यात द्या, सर्व नगरसेवक निवडुण द्या म्हणजे विकास कामे करण्यासाठी गति मिळेल. आपण पुरोगामी विचार घेवून लोकांसमोर जातो, सर्व समाज घटकांना सोबत घेवून जात असतांना आपले आशिर्वाद कायम राहू द्या असे आवाहनही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले. यावेळी बोलतांना माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, मोमीनपुर्‍याला जाणीवपुर्वक विकासापासून दूर ठेवल्या गेलं. पालिकेतील नगराध्यक्षांची मानसिकता विकास करण्याची नाही. रमजानसारख्या पवित्र महिन्यात एकदा पाणी दिलं गेलं. स्वच्छता केली गेली नाही. अशा वेळी आ.संदिप भैय्यांनी स्व खर्चातून स्वच्छता करून घेतली. कोरोना काळात सॅनिटायझर फवारणी केली. येत्या काळात बीड शहराचा विकास करण्यासाठी आ.संदिप भैय्यांच्या नेतृत्वात पुर्ण पालिका ताब्यात द्या. त्यांच्या पाठिशी ताकद उभी करा असे आवाहनही यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांनी केले. तर माजी आ.सुनिल धांडे म्हणाले की, माजी मंत्री नगराध्यक्ष 25 वर्षापासून सत्तेत आहेत. परंतू त्यांना मोमीनपुरा विकासासाठी कधी दिसला नाही. त्यांना ही जनता पाहून झोप येणार नाही. या भागाचा विकास करण्यासाठी आ.संदिप भैय्यांच्या पाठिशी आपण ताकद उभी करा असे आवाहनही त्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोमीनपुरा भागातील राष्ट्रवादी काँग्रेच कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा