Subscribe Us

header ads

धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडेंवर नाव न घेता टीका!!

बीड स्पीड न्यूज 

बीड_ बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला टोला धनंजय मुंडे म्हणाले की,विरोधकांनी आम्हाला टिका केली होती की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निधी हवेत आहे का? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सवाल उपस्थित केला होता या सवलास प्रतिउत्तर देत धनंजय मुंडे म्हणालेत की 502 कोटी चा निधी आम्ही एकट्या बीड जिल्ह्यासाठी मजूर करून आणला व आज जवळपास 15% शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा सुद्धा झाले आहे महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचे सरकार आहे तर पुढे बोलतांना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता माध्यमांसमोर म्हणाले की,आज मी त्या लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की त्यांनी केंद्राचे एक ही पथक सुद्धा पाहणी साठी आणले नाही असा खोचक टोला नाव न घेता पंकजा मुंडे यांना लगावला.

चंद्रकांत दादा पाटील यांचे खिसे एवढे मोठे नाहीत

भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या खिशाच्या वक्तव्यावरुन, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पलटवार केलाय. ते म्हणाले, की चंद्रकांत दादा पाटील यांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही राज्यापासून केंद्रातल्या नेत्यांचे, खिसे एवढे मोठे नाहीत की तुम्ही आम्हाला खिशात ठेवतील.. तुम्ही ज्यांनी त्यांनी आपली आपली ठेऊन बोलायला पाहिजे..तुम्ही याठिकाणी कुणाला खिशात ठेवतो, कुणाला पाकीटमध्ये ठेवतो, ही भाषा चंद्रकांत दादा पाटील यांसारख्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य अध्यक्षाला शोभणारे नाही. असा पलटवार पाटील यांच्या वक्तव्यावरुन धनंजय मुंडे यांनी केला आहे..

रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचीत जातीच्या युवक-युवतींसाठी महत्वाचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. शिक्षण प्रशिक्षण या माध्यमातून सक्षम करून त्यांना विविध क्षेत्रात उत्तम नोकरी व रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याच्या उद्देशाने राज्यात व्यापक स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये दिली. विभागाने या संबंधात अनेक क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांना दिशादर्शक होईल असे आणि यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल अशा पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला. आता त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचं मुंडे म्हणाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात बँकिंग, रेल्वे, एलआयसी, इत्यादि क्षेत्रातील नोकर्‍या तसेच पोलिस व मिलिटरी भरती आणि Aptitude Test वर आधारीत खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्कृष्ट नोकर्‍या करिता घेतल्या जाणार्‍या परीक्षांच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण राबविण्याकरिता दि. 28 ऑक्टोबर 2021 सामाजिक न्याय विभागाने शासन आदेश काढला. बार्टी पुणे यांना हे प्रशिक्षण राबविण्याची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा