Subscribe Us

header ads

रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम याच्यासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा; राम रहीमला 31 लाख आणि इतर 4 दोषींना 50-50 हजारांचा दंड

पंचकुला_डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला रणजीत सिंह हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यासह 4 आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने रणजीत सिंगच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह 5 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीमला 31 लाख आणि इतर 4 दोषींना 50-50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

रणजीत सिंह हत्या प्रकरणात दोषी

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह साध्विंच्या लैंगिक शोषणात आधीच तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 10 जुलै 2002 रोजी रणजीत सिंह यांची हत्या झाली होती. या प्रकरणात गुरमीत राम रहीम सिंह दोषी आढळला आहे. सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी एफआयआर नोंदवला होता. 2017 मध्ये सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमसह 5 लोकांना दोषी ठरवलं. राम रहीम व्यतिरिक्त, कृष्ण लाल, अवतार, सबदील आणि जसबीर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

राम रहिम इतर गुन्ह्यात दोषी

सीबीआयच्या विशेष न्यायालयात न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांनी सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपीला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, यापूर्वीच गुरमीत राम रहीमला साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. याशिवाय तो पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.


 परिसरात कलम 144 लागू

आजच्या निर्णयामुळे पंचकुलामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र करण्याची परवानगी नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी आहे. आयटीबीपीच्या चार तुकड्या सीबीआय कोर्ट कॉम्प्लेक्स आणि चारही प्रवेशद्वारांवर तैनात केल्या जातील.

काय होता प्रकरण ?

कुरुक्षेत्रातील रहिवासी आणि डेराच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन समितीचा सदस्य रणजीत सिंह याची 10 जुलै 2002 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गुरमीत राम रहीम, डेराचा तत्कालीन व्यवस्थापक कृष्ण लाल, अवतार, जसबीर आणि सबदील यांना पंचकुला येथील हरियाणा विशेष सीबीआय न्यायालयाने 8 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवलं होतं. मारेकऱ्यांमध्ये पंजाब पोलिस कमांडो सबदील सिंग, अवतार सिंग, इंदरसेन आणि कृष्णलाल यांचा समावेश होता. रणजीत सिंहची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी वापरलेली शस्त्रे डेराच्या आश्रमात लपवली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा