Subscribe Us

header ads

बाबामिया इनामदारनगर, सय्यदअली नगर, तेलगाव रोडला रस्ते, नाली, पथदिवे, पाणीपुरवठा 8 दिवसात करा; अन्यथा आम आदमी पार्टी नगरपरिषदेला घेराव घालणार, मुख्याधिकाऱ्यांना इशारा

 बीड स्पीड न्यूज

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
♦♦♦♦♦♦♦

बीड (प्रतिनिधी) बीड नागरपरिषदेच्या हद्दीमध्ये येणारा भाग बाबा मिया इनामदार नगर गल्ली नंबर 1 व 2 सय्यद अली नगर तेलगाव रोड बीड येथील बऱ्याच दिवसापासून येथील नागरिकांना कसल्याही प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाहीत तेथे नाली रस्ते पथदिवे नळाची व्यवस्था कसल्याही प्रकारची आपण नगरपालिकेच्या मार्फत पुरवण्यात आलेली नाही. मुख्याधिकारी व नगर परिषद बीड यांनी कसल्याही प्रकारे इकडील कामाकडे दखल दिलेली नाही. पाठीमागील दोन महिन्यापूर्वी आपल्या नगरपालिकेला येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे अवगत केले होते परंतु त्या निवेदनाचा मुख्याधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही म्हणून आम आदमी पार्टी बीड आपणाला निवेदनाद्वारे कळवत आहे की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत आपल्या नगरपालिकेने त्यांच्या रस्ते नाली नळ पथदिवे याची पूर्तता करण्यात यावी अन्यथा येथील संपूर्ण नागरिक आपल्या कार्यालयावर ती आम आदमी पार्टीच्या माध्यमाने धडक मोर्चा घेऊन येईल याची सर्वस्व जिम्मेदारी आपल्या कार्यालयाची असेल. असा इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी दिलेला आहे. यावेळी शहराध्यक्ष सय्यद सादेक, संघटन मंत्री प्रा ज्ञानेश्वर राऊत, शाकेर भाई इनामदार, सदाम भाई, समीर शेख, शेख नदीम, एजाज भाई व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा