Subscribe Us

header ads

बीडमध्ये केंद्रीय आयकर विभागाचा निषेध आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली निदर्शने धाडी थांबवा नाही तर महाराष्ट्रातल्या तरूणांचा संयमाचा बांधा फुटेल -आ.संदिप क्षीरसागर

 बीड स्पीड न्यूज

बीड (प्रतिनिधी):- केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने निदर्शने करून केंद्रीय आयकर विभागाचा निषेध नोंदवण्यात आला. एकच वादा, अजितदादा! केंद्रीय आयकर विभागाचा धिक्कार असो, या केंद्रातील भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय अशा घोषणा परिसर दणाणून गेला होता. इतिहास साक्षीला आहे, महाराष्ट्र कधी झुकत असो, दिल्ली असो या कुणीही यापुढे वाकत नसतो असा इशारा देत आम्ही पवार कुटुंबियांवर जिवावर उदार होवून प्रेम करतो म्हणून तुम्ही आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट ताकदीने पलटवार करू, आता धाडी थांबवा नाही तर आम्हा महाराष्ट्रातील सर्व तरूणाचा हा संयमाचा बांधा फुटेल असा इशाराही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिला आहे.
मंगळवार दि.12 ऑक्टोबर रोजी केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, अ‍ॅड.प्रज्ञाताई खोसरे, जिल्हाध्यक्षा संगिताताई तुपसागर, कमलताई निंबाळकर, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, अनिताताई वाघमारे, विद्याताई जाधव, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, अशोक रोमण, जावेद कुरेशी, जयमल्हार बागल, राजु महुवाले, अशोक वाघमारे, यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय आयकर विभागाच 

निषेध नोंदवून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत सदर निवेदन केंद्रीय आयोगाला पाठवण्यात आले. यावेळी घोषणांनी नगर रोडसह परिसर दणाणून गेला होता. यावेळी मदन जाधव, माऊली सानप, कुंदन काळे, रमेश चव्हाण, विजय लव्हाळे, राणीताई शेख, जयतुल्ला खान, लक्ष्मण विटकर, शोएब इनामदार, युवक तालुकाध्यक्ष नंदु कुटे, बाळासाहेब शिंदे यांच्यासह आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, सुडबुद्धीने छापेमारी करणार्‍या केंद्रीय आयकर विभागाच्या निषेधार्थ ही निदर्शने करत आहोत. अजित दादांवर अनेकदा आरोप, टीका झाली आम्ही संयमाने प्रतिउत्तर दिले. पण तुम्ही जर विनाकारण आमच्या आई, बहिणींच्या घरी धाडी टाकून प्रसिद्धीचा आव आणत असाल तर जास्त काळ सहन करणार नाही. आम्ही पवार कुटुंबियांवर जीवावर उदार होवून प्रेम करतो. तुम्ही आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. जेवढ दाबण्याचा प्रयत्न कराल त्याच्या दुप्पट ताकदीने पलटवार करू, आता धाडी थांबवा नाही तर आम्हा महाराष्ट्रातील सर्व तरूणांचा संयमाचा बांधा तुटेल असा इशारा यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या निदर्शनाच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा