Subscribe Us

header ads

पुरोगामी पत्रकार संघ व साई स्पोर्ट्स वतीने जागर स्त्री शक्तीचा,सन्मान नवदुर्गाचा

 बीड स्पीड न्यूज


अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ व साई सोशल ॲन्ङ स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पिंपळे गुरव येथे समाजातील  नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
नवरात्र हा भारतीय महिलांचा* *लोकप्रिय सण याचे औचित्य साधून निता रझदान कुल (संचालक),एकता तिवारी (मॉडेल अभिनेत्री), पूनम अजय लांडगे (उद्योजक), डॉ  भावना शेंकार (डॉकटर), अॅडव्होकेट स्मिता विक्रम पानसकर (कायदेतज्ज्ञ),  माही मानोचा (संचालक), ॲडव्होकेट उर्मिला जाधव (कायदेतज्ज्ञ), निता मोकाशी (समाजसेविका), प्रियांका अजय आगवणे (शिक्षिका), पूजा रेड्डी (मॉडल अभिनेत्री) क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी बजावत असलेल्या कर्तव्यदक्ष 

योगिनींना नवशक्ती नवदुर्गा या पुरस्काराने  संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व मा.राज्यमंत्रि ङाॅक्टर मदन कोठूळे यांच्या हस्ते मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या महिलांचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले आहे,अशा प्रेरणादायी व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान माझ्या हस्ते होत असल्याचा मला अभिमान आहे,असे विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.*
यावेळेस प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी माजी मंत्री डॉक्टर मदन कोथळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व्यंकटेश जाधव महिला अध्यक्ष सुनिता तोमर क्रीडा विश्‍वाचे अध्यक्ष फिरोज खान संघाचे उपाध्यक्ष दिप्ती शहा महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख विजय म्हात्रे शिवधर्म वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राहुल पडवळ संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष संतोष भोईर उपाध्यक्ष दिनेश भोईर तालुका सचिव लक्ष्मण गडगे मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  सुनिता तोमर व संघाचे प्रदेशाध्यक्ष फिरोज खान यांच्या अभिनव संकल्पनेतून महिलांचा सन्मान वाढविणारा हा उपक्रम राबविण्यात आला असल्याने,महिला वर्गातून कौतुक होत आहे.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा