Subscribe Us

header ads

चोरीच्या सहा मोटारसायकल जप्त; एका आरोपीला अटक चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि भास्कर नवले यांच्या पथकाची कारवाई

 बीड स्पीड न्यूज

गेवराई_चकलांबा परिसरात मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. दरम्यान एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अन्य सहा मोटारसायकल चोरल्याचे समोर आले. या चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. हि कारवाई चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, चकलांबा येथील सरपंच सुरेश जाजू यांच्यासह काही ग्रामस्थांनी आरोपी शाहरुख हमीद शेख रा.शेवगांव ता.शेवगांव जि.अहमदनगर याला मोटारसायकल चोरताना पकडले. या आरोपीला चकलांबा ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर सपोनि भास्कर नवले यांनी आरोपी शाहरुख शेख याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अन्य सहा मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या सहा मोटार सायकल अंदाजे 3 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भास्कर नवले, पोलिस उपनिरीक्षक डिगांबर पवार, पोलीस नाईक श्रीधर सानप, अमोल येळे, मुकुंद एकशिंगे, तुकाराम पवळ, महेश रुईकर यांनी केली असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा